माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज उपविभागीय पोलीस अधिकारी-विक्रम कदम

 

माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज उपविभागीय पोलीस अधिकारी-विक्रम कदम



पंढरपूर

                1 हजार 550 पोलीस अधिकारी व कर्मचारी, एक एसआरपीएफ तुकडी

                 माघ शुद्ध एकादशी 01 फेब्रुवारी 2023 रोजी असून, या माघी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. माघी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 1 हजार 550 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.


यामध्ये 02 पोलीस उपअधिक्षक, 21 पोलीस निरिक्षिक, 69 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 713 पोलीस कर्मचारी व 700 होमगार्ड तसेच 01 एसआरपीएफ कंपनीच्या तुकडी तर एक शिघ्र कृती दल पथक नियुक्त करण्यात आले आहेत

वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड या सहा ठिकाणी वॉच टॉवर करण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रासह नव्याने नगर प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी सांगितले.   



                        वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे. Security तसेच वाहतुक नियमनासाठी 12 ठिकाणी डायव्हरशन पॉईट करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात तसेच शहराबाहेर 12 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असल्याचेही कदम यांनी सांगितले. Security भाविकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी नागरिकांनी व भाविकांनी पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी केले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad