अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची 2022 मे 25 करिता निवड,
पंढरपूर दि.२९- अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या 2022 में 25 या सालकरिता नविन कार्यकारिणी निवड करण्यात त्याप्रमाणे अध्यक्षपदी राजेंद्र कोढरे, वि. उपाध्यक्ष पदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील ( अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळ) सरचिटणीस पदि प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्ष पदि - प्रमोद बळवंत जाधव, वि. चिटणीस पदी- अतिश गायकवाड यांची निवड निर्णय अधिकारी अँड प्रविण गोगावले यांनी वाचून दाखविली व त्यास मराठा महासंघाच्या सर्व साधारण सभेने राज्यांच्या मंजुरी दिली .
सदर निवडणूक प्रक्रियेस काही व्यक्तीनी मुंबई सत्र न्यायालय व उच्च न्यायालय मुंबई येथे अर्ज केले होते. त्यास स्थागिती देण्यास न्यायालयाने नकार दिला..
त्यानंतर आज दि २९/१/२०२३ रोजी पंढरपूर येथे सर्वसाधारण सभा झाली त्यास राज्याच्या सर्व भागातून मोठ्या संख्येने सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.
३ लाख कुटुंबा पर्यंत संपर्क साधून महासंघाची संघटनात्मक बांधणी करून महासंघ यापुढे मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न, सामाजिक सलोखा, उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कृषी याविषयावर मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे असे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले