*उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट च्या वतीने हिंगणघाट शहरात हत्तीरोगदिन व कुष्ठरोग निवारन दिनानिमित्त जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन*
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्याने जागतिक कुष्ठरोग निवारन दिन व स्पर्श जनजागृती करिता उपजिल्हा रुग्णालय मार्फत प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रभातफेरीच्या सुरुवातिला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. मा.डॉ.किशोर चाचरकर , वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट तसेच मा.विशाल रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रभातफेरी ला सुरुवात केली. यावेळी या प्रभात फेरीमार्फत शहराच्या विविध भागात जाऊन हत्तीरोग तसेच कुष्ठरोग याबाबत जनजागृती करण्यात आली.यावेळी "गप्पी मासे पाळा, हत्तीरोग टाळा" आणि " कुष्ठारोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठारोगाला इतिहास जमा करूयात" असे घोषवाक्याचा नारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आले.
सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा( कुष्ठरोग) वर्धा आणि
जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी वर्धा, यांच्या संयुक्त विद्यमाने मा.डॉ.किशोर चाचारकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्गदर्शनात या हत्तीरोग व कुष्ठरोग जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभात फेरीच्या सुरुवातीला मा. डॉ. किशोर चाचरकर यांनी हत्तीरोग तसेच कुष्ठारोगाबाबत जनमानसात असलेला गैरसमजदूर करून प्रतिबंधात्मक उपायोजना करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कुष्ठरुग्ण हे समाजाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे समाजाच्या प्रवाहापासून ते दूर जाऊ नये यासाठी स्पर्श मोहिमेचे महत्व डॉ. विशाल रुईकर यांनी पटवून सांगितले. या प्रभातफेरीला संजय गांधी स्मृती विद्या मंदिर, हिंगणघाट तसेच भारत विद्यालय हिंगणघाट चे विद्यार्थी व शिक्षकगण यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
प्रभातफेरीचा समरोप हा उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे करण्यात आला. त्यावेळी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेसमोर 2 मिनिटाचे मौन पाळून प्रभातफेरीचा समोरोप करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री उमेश मेश्राम यांचे कडून करण्यात आले. तसेच मा. तुंबडे,आरोग्य सहाय्यक, रा. ह. नि. उपपथक हिंगणघाट यांनी हत्तीरोगाबाबत माहिती दिली. प्रशांत बारडे, अवैद्यकीय सहाय्यक व प्रशांत जंगठे, अवैद्यकीय सहाय्यक हिंगणघाट यांनी दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेची विशेष माहिती सांगितली. तसेच श्री मिलिंद डोनारकर यांनी हिवतापाबाबत प्रतिबंधत्मक माहिती सांगितली. यावेळी संचालन श्री. अजय लीडबे तर आभार प्रदर्शन श्री सचिन खंदार, यांनी केले.
या प्रभातफेरीस श्री राम मेश्राम, श्री. अमोल कुमरे, श्री. सुभाष वडगे, श्री शुभम गावंडे, श्री सिद्धार्थ बहादे, श्री वरभे, श्री येणोरकर, श्री नांदुरकर, श्री चांद जगताप इत्यादीनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित राहून सहकार्य केले.