मराठवाड्याची बुलंद तोफ थंडावली. क्रांतिवीर जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे यांचं वयाच्या 102 व्या वर्षी निधन.
कंधार ता.प्र. शिवराज पाटील इंगळे
मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 102 व्या वर्षी औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आमदार खासदार राहिलेल्या धोंडगे यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली त्यामुळेच शेकाप मध्ये असतानाही त्यांच्या कामाचा धबधबा होता.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आलेल्या केशवराव धोंडगे यांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. ते तब्बल सहा वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम असो की संयुक्तमहाराष्ट्राची चळवळ असो मोठमोठ्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. जनतेवरच त्यांचे प्रेम आणि जनतेचा भाई वरचा विश्वास याच बळावर ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचले. विधानसभेतील त्यांची अनेक भाषणे प्रचंड गाजली जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती मराठवाड्याची बुलंद तोफ म्हणून त्यांची ख्याती होती.नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वतःला जोडून घेतले. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोट तिडकिने विधिमंडळ व संसदेत मांडले. स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने राज्याची न भरून निघणारी हानी. खासदार प्रताप पाटील चिखलीकर सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आणि कामगार चळवळीची न भरून निघणारी हानी झाली आहे भाई केशवराव धोंडगे यांनी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे अनेक वेळा नेतृत्व केले तर संसदेत खासदार म्हणूनही त्यांनी आपली भूमिका बजावली होती. गोरगरीब शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक शिक्षण संस्था उभारून मोठी शैक्षणिक चळवळ निर्माण केले होते. भाई डॉक्टर केशवराव धोंडगे यांनी आपल्या जीवनातील तत्त्व कायम पणे जपली होती. शंभरी पार करणाऱ्या भाई डॉक्टर धोंडगे शेतकरी कामगार चळवळीचे नेतृत्व ही मोठे हिंमतीने आणि सक्षमपणे केले होते. नांदेड आणि मराठवाड्यातील कामगार चळवळीचा एक आक्रमक चेहरा म्हणूनही त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय चळवळीचे प्रचंड नुकसान झाले आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशा शब्दात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.