शेतकरी कामगार पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी बालाजी ईसादकर तर नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अवधूत पा. शिंदे हरबळकर यांची निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार
लोहा कंधार मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते बालाजी इसादकर यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी तर अवधूत पाटील शिंदे हरबळकर यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे, काल मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या नागपूर विभागीय कार्यालयात शेकापचे सरचिटणीस तथा आमदार भाई जयंत पाटील,लोहा कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे,शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र बालाजी ईसादकर व अवधूत पाटील शिंदे हरबळकर यांना देण्यात आले. सर्वसामान्य ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील जन्म घेतलेल्या या दोन्ही कार्यकर्त्यास शेतकरी कामगार पक्षाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी आमदार शामसुंदर शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे, मराठवाडा सहचिटणीस विक्रांत दादा शिंदे यांच्या सूचनेवरून बालाजी ईसादकर व अवधूत पाटील शिंदे हरबळकर यांची शेतकरी कामगार पक्षाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने भाई आमदार जयंत पाटील, आमदार श्यामसुंदर शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे,विक्रांत दादा शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य रोहित पाटील शिंदे यांनी बालाजी इसादकर व अवधूत पाटील शिंदे हरबळकर या नवनिर्वाचित नांदेड जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांचे अभिनंदन केले आहे, या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.