शासन निर्णया व्यतिरिक्त वैयक्तिक श्रद्धेचे फोटो जि.प.शाळात लावू नयेत ; प्राथमिक शिक्षण विभागाचे पत्र संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश

 शासन निर्णया व्यतिरिक्त वैयक्तिक श्रद्धेचे फोटो जि.प.शाळात लावू नयेत ; प्राथमिक शिक्षण विभागाचे पत्र


संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश


प्रतिनिधी 




सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळातील वर्गात तसेच कार्यालयात सर्रासपणे शासन निर्णया व्यतिरिक्त इतर अनेक फोटो लावलेले दिसून आल्याने असे वैयक्तिक श्रद्धेचे फोटो शाळांमध्ये लावण्यास प्रतिबंध करावा यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन देण्यात आले होते. या वैयक्तिक श्रद्धेच्या असंवैधानिक प्रतिमा शाळांमधून संबंधित शाळांनी न काढल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाभर मोहिम राबवण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी निवेदनाद्वारे दिला होता. 





त्यानुसार आता शासन निर्णयानुसार ठरवुन दिलेल्या महापुरुष,महामाता, राष्ट्रीय अस्मिता,संविधान व प्रतिमा या व्यतिरिक्त वैयक्तिक श्रध्देचे फोटो शाळेत लावणे असंवैधानिक असुन असे फोटो लावण्यास प्रतिबंध करण्यात यावा अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे. आमच्या मागणीला यश आले असुन या पत्रामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वैयक्तिक श्रद्धेचे फोटो शाळांमधून निघणार असून वैज्ञानिक दृष्टिकोन हे मुल्य विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागण्यास मदत होईल असे मत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad