लोहयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी श्रेयवादाचा वनवास संपेता संपेना पूर्णाकृती अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा लोहा पालिकेच्या ताब्यात मूर्ती स्थापन मिरवणूक अर्धवटच

  लोहयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी श्रेयवादाचा वनवास संपेता संपेना


पूर्णाकृती अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा  लोहा पालिकेच्या ताब्यात 



मूर्ती स्थापन मिरवणूक अर्धवटच


--------------------------------------



नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार 





लोहा शहरात नववर्षाच्या प्रथम समयी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा स्थापन करण्याच्या प्रक्रियेला अडकाठी आणली.  पुन्हा एकवार श्रेयवादाचा संघर्ष सुरूच राहिला. रविवारी दि .१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास  लोहा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या पुढाकाराने आणलेल्या अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळ्याच्या मिरवणुकीस अतिरिक्त सुरक्षा बल, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने स्थगिती देत पुतळा ताब्यात घेतला . यावेळी शिवप्रेमींनी शांतता दाखवत प्रशासनाला सहकार्य केले.


लोहा नगरपरिषदेच्या ताब्यात पूर्णाकृती पुतळा व  संबंधित वाहन देत असताना पंचनामा करण्यात आला.  यावेळी खंडू पवार,संजय कराळे ,कपिल किरवले, संदीप पवार ,अकबर मौलाना,  शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश  पाटील हिलाल, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन कराडे,   छावाचे जिल्हा अध्यक्ष माऊली पाटील पवार,  मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील चव्हाण,  माजी जि.प. सभापती संजय पाटील कराळे, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.



लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पूर्णाकृती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा यासाठी सन २००३ पासून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे चौकात पूर्ण आकृती पुतळा बसवण्यास मंजुरी नसल्याचे कारण दाखवत आतापर्यंत चार वेळा आंदोलन झाली. चारही वेळा शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षेच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आला. मध्यंतरी सन २००४-०५ च्या काळात तत्कालीन पोलीस निरीक्षक हनुमंत परांडे यांनी पुतळ्यास राज्य शासनाची अनुमती नसल्याचे कारण दाखवत भाई केशवराव धोंडगे यांना पुतळा सुरक्षेच्या कारणावरून बंदिस्त आदेश पारित केला होता.



गाझियाबाद शिल्पकला स्टुडिओ येथून ब्रांच धातूचा १४ फूट उंच पूर्णकृती अश्वारूढ पुतळा मागवण्यात आला. रविवारी  दिली.१  जानेवारी २०२३ रोजी सकाळी तो शरद पवार पाटील यांच्या निवासस्थानी आणला .यावेळेस शिवप्रेमींनी एकच गर्दी केली.


जंगी मिरवणूक काढत हा पुतळा नियोजित ठिकाणी स्थापित करण्याचा मनोदय असता शिक्षक मतदार संघाच्या  निवडणूक आचारसंहिताचे कारण दाखवत प्रशासनाने मिरवणुकीस बंदी घातली.


यावेळी अतिरिक्त सुरक्षा बल स्थानिक पोलीस यांची मोठी कुमक मागविण्यात आली. उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक,  तहसीलदार व्यंकटेश मुंडे,पोलीस निरीक्षक संतोष तांबे, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी हस्तक्षेप केला. हा पूर्णाकृती पुतळा हस्तांतरित करता येणार नसल्याचे कारण दाखवत लोह्याच्या पालिका पटांगणात ठेवला.


पुतळा स्थापन समितीचे शरद पाटील पवार म्हणाले पूर्णाकृती पुतळा हा ब्रांझ धातूचा असून कुठल्याही छुप्या मार्गाने बसवण्याचा आमचा मनोदय नव्हता . दगडी चबुतऱ्याचे काम पूर्ण होत असताना छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी आडकाठी कशाला ? असा संतप्त सवाल त्यांनी केला.  नियोजित जागा हस्तांतरण करून संबंधित कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे.  चबुतराचे दगडी काम स्वखर्चातून केले आहे. मात्र राजकीय श्रेय वादाच्या लढाईत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास बसवण्यास मज्जाव कशासाठी केला? शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पुढील काळात सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन लोकार्पण करण्याचा मनोदय आहे.


 भाजपा आणि काँग्रेस असा वाद शिवछत्रपतींच्या पुतळ्यासाठी सामाजिक कार्यात असू नये. मात्र तो केला जातो. माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी पुतळा सुशोभीकरणासाठी  ७५ लाख रुपये एवढा निधी दिला . आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले होते.  खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पालकमंत्र्याला कारणे  सांगत स्थगिती  का आणली? असा सवाल केला.


आ. शामसुंदर शिंदे यांनी दिली घटनास्थळाला भेट 

____________________________


लोहा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच समाजमंदिर येथे प्रशासनातील अधिकारी एसडीओ मंडलीक, तहसीलदार मुंडे, मुख्याधिकारी पेंटे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्या वाहनात अश्वारूढ पुतळा होता तेथे भेट दिली असता शिवप्रेमी जनतेने आ. शामसुंदर शिंदे यांना व शरद पाटील पवार यांना खांद्यावर उचलून घेऊन नारेबाजी करीत ठेका ठरला.



प्रतिक्रिया

संजय पाटील कराळे

माजी जिल्हा.प. सभापती

__________________________


" छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा हा काही कुणा एकट्याचा विषय नाही. पुतळा बसावा यासाठी मुस्लिम समाज आणि बहुजन समाजाने मोठी आर्थिक मदत केली आहे. लोह्यात सातत्याने छत्रपतीच्या पुतळ्या बाबत अवमान होतो आहे . पुतळा संरक्षण कामात महाराजांचा अवमान न होता पालिकेने संरक्षण द्यावे.  तत्काळ पुतळा नियोजित स्थळी बसवावा."



प्रतिक्रिया

लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे

________________________


" यावेळी प्रतिक्रिया देताना लोहा न.पा.चे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे म्हणाले की, सदरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज बसविण्यासाठी आणलेला व मिरवणूक काढलेली अनाधिकृत होती. त्यांना शासन व प्रशासनाची मान्यता नव्हती माननीय जिल्हाधिकारी नांदेड व उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या सुचनेनुसार शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सदरील पुतळा हा लोहा न.पा. च्या ताब्यात घेतला आहे.

 लोहा न.पा. च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा १ कोटी रुपयांचा बसविण्यात येणार आहे. त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष लोहा न.पा. चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी आहेत. लोहा न.पा. च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी टेंडर काढले आहे याची 

अधिक माहिती नगराध्यक्ष देतील असे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे म्हणाले.

 तसेच हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लोहा न.पा. पोलिसांच्या व लोहा न.पा. च्या संरक्षणाखाली राहिल असे ही मुख्याधिकारी गंगाधर पेंटे म्हणाले.

तसेच यावेळी प्रतिक्रिया देताना 

शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा पुतळा कुणीही लवकर बसवावा.

 

लोहा शहर  कडकडीत बंद 

_________________________


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आलेली व परवानगी नसताना पुतळा बसविण्यासाठी जात असताना भाजी मंडई ते बस स्थानका दरम्यान पोलिसांनी मिरवणूक   आडवली व मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सौम्य लाठी चार्ज केला यावेळी व्यापाऱ्यांनी आपले दुकाने,हाॅटेल बंद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad