आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माळेगाव यात्रा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार
दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री. क्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेनिमित्त काल गुरुवारी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली यावेळी यात्रा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुंभार, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, नायब तहसीलदार अशोक मोकले, कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे ,तालुका कृषी अधिकारी पोटपेलवार, माळाकोळी सहायक पोलिस निरीक्षक डोके, उपसभापती श्याम अण्णा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माळवदे, माजी सभापती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे, सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, सरपंच पुंडलिक पाटील बोरगावकर, सरपंच पंजाब माळेगावे, भास्करराव पाटील जोमेगावकर, पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो,उपमुख्य कार्यकारी पाणीपुरवठा मिसाळ, जिल्हा कृषी अधीक्षक चिमण शेटे, गटविकास अधिकारी शैलेश वावळे, माजी पंचायत समिती सदस्य जनार्दन तिडके, लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार ,माजी नगरसेवक अनिल दाढेल ,सरपंच हौसाजी वाघमारे, माळेगावचे सरपंच हनुमंत धुळगंडे, माळाकोळी सरपंच मोहन काका शूर प्रमुख उपस्थित होते, यावेळी यात्रा सचिव डॉ.सुधीर ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या बैठकीत माळेगाव यात्रेत येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला, यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा विभाग, महावितरण विभागाला यात्रेत अखंडित वीजपुरवठा व येणाऱ्या सर्व भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी विविध ठिकाणी यात्रेमध्ये उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी आमदार शिंदे यांनी दिले, पालखी मार्गाच्या रस्त्याचे काम दर्जेदार होणारा असून कृषी विभागाच्या वतीने विविध स्टॉल उभारण्यात येणार आहेत यात्रा काळात सुरक्षेच्या दृष्टीने १००० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त यात्रा काळात राहणार असून यात्रेत पालखी मार्गावर व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सहा सीसीटीव्ही कॅमेरे व दोन ड्रोन कॅमेरे राहणार असल्याचे पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या यात्रेत कुस्ती स्पर्धा, विविध स्टॉल सह पारंपारिक लोककला महोत्सव, लावणी महोत्सव, राहणार आहे पशुसंवर्धन विभाग व आरोग्य विभाग दारूबंदी विभाग ,महिला व बालकल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभागाच्या वतीनेही यात्रेत महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले, यावेळी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे पूर्वतयारी आढावा बैठकीत बोलताना म्हणाले की, दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेत सर्वसामान्य नागरिकांना विशेषता महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी आमदार शिंदे यांनी आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले, माळेगाव यात्रेचे वैभव वाढविण्याच्या दृष्टीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे नियोजन करून या दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या खंडोबारायाच्या यात्रेला कसलेही प्रकारचे गालबोट न लागता शांत व निर्भयपणे यात्रा पार पाडण्यासाठी व यात्रेत येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना मूलभूत सोई सुविधा पुरविण्यासाठी सर्व विभागाने तत्परतेने तयारी करून मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रामाणिक व काटेकोर प्रयत्न करण्याचे निर्देश यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी श्री क्षेत्र खंडोबा राया यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीत उपस्थित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी राजू पाटील कापससीकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते, अशोक बोधगिरे, राहुल बोरगावकर, सोपान केंद्रे, निखिल मस्के ,महेश पिनाटे, नागेश खाबेगावकर उपस्थित होते.