हिमाचलप्रदेश मध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल लोहा शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

 हिमाचलप्रदेश मध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल लोहा शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष


नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार



लोहा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने हिमाचलप्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल बस स्थानक समोर फटाके फोडून जल्लोष काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला आहे. 


नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश राज्याच्या विधान सभेच्या निवडणूकीचा निकाल जाहिर झाला असुन काँग्रेसचे राष्ट्रीयनेते खा. राहूल गांधी यांच्या भारत जोडो याञेचा परिणाम होवून विद्यमान भाजपाचे सरकार सत्तेवरुन जनतेने खाली खेचुन काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत देवून दणदणीत विजयी केल्या बद्यल लोहा शहरात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठा जल्लोस करुन फटाक्याची आतिष बाजी केली यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शरद पाटील पवार, शरहाध्यक्ष वसंत पवार, माजी उपनगराध्यक्ष सोनु संगेवार, कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर, उपाध्यक्ष उत्तम महाबळे, गंगाधर महाबळे, अकबर  मौलाना, माजी नगरसेवक पंकज परिहार, आनिल दाढेल,माजी सौनिक  व्यंकट घोडके, पिनू चुडावकर,गोवर्धन पवार आदीसह मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते नागरीक उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad