कांग्रेस पक्षाच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांची निवड
* *नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार
लोहा तालुक्यात धार्मिक सामाजिक राजकीय कार्यात सदैव अग्रेसर असणारे सर्वांना परिचित असलेले लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांची कांग्रेस पार्टीच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
गेल्या वीस वर्षांपासून लोहा शहर व तालुक्यात विविध क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात अग्रेसर राहून आपली ओळख निर्माण करणारे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांनी यापूर्वी शिवसेना तालुका प्रमुख त्यानंतर भाजपचे तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली त्यांच्या पदाच्या कार्यकाळात या तालुक्यातील विधानसभा लोकसभा व विविध सहकारी संस्था शहरातील नगरपालिका यावर पक्षाची सत्ता स्थापन करून देण्यात त्यांचा सिहाचा वाटा राहिला आहेे.
आठ महिन्यांपूर्वी भाजप पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी भाजप पक्षाच्या तालूका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेस पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी कांग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्या नंतर त्यांनी कांग्रेस पक्षाची एकनिष्ठा बाळगून कांग्रेस पक्षाची ताकद मतदारसंघात वाढविण्याचा प्रयत्न केला पक्षाच्या विविध मोहिमेत त्यांनी सहभाग घेऊन तालुक्यात कांग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचे काम केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन कांग्रेस पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लोहा तालुका अध्यक्ष पदी शरद पाटील पवार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
यावेळी माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर, माजी मंत्री डी पी ,सावंत ,आमदार अमरभाऊ राजूरकर ,आमदार मोहन अण्णा हंबर्डे , जिल्हा अध्यक्ष गोविदरावं पाटील नागेलीकर माजी आमदार ईश्वरराव भोसीकर ,माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे लोहा शहर अध्यक्ष वसंत पवार यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते या निवडीबद्दल माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार ,नगरसेवक पंचशील कांबळे, बालाजी शेळके ,माजी सभापती अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरफुदिन शेख ,मा नगरसेवक पंकज परिहार, अकबर मौलाना माजी नगरसेवक उत्तम महाबळे बाबासाहेब बाबर ,व्यंकट घोडके, बालाजी कपाळे, गणेश घोरबांड शहराध्यक्ष पांडुरंग शेटे यांच्यासह आदिने अभिनंदन केले आहेे.