मंगरूळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी किरण भैय्या हाके तर उपसरपंच पदी नरहरी शिंदे यांची बिनविरोध निवड

 मंगरूळ ग्रामपंचायतीच्या  सरपंच पदी किरण भैय्या हाके तर उपसरपंच पदी नरहरी शिंदे यांची बिनविरोध निवड


 

----------------------------------------------------------

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 

लोहा तालुक्यातील मौजे मंगरुळ २०२२ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध पार पडली असुन सरपंच पदी किरण ज्ञानेश्वर पाटील हाके ( भैय्या) यांची तर उपसरपंचपदी नरहरी संभाजी पाटील शिंदे व सर्व ग्राम पंचायत सदस्यांची निवड ही बिनविरोध पणे करण्यात आली आहे.

 गाव करील ते राव करील सबका साथ सबका विकास सर्व गावकरी मंडळी एकत्रीत येऊन सर्वांशी संवाद साधुन निवडणूकीसाठी वेळ, पैसा खर्च न करता व गावात एकमेकांना विरोध न करता एकदिलाने मंगरुळ ग्रामपंचायती २०२२ सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध काढण्यात आली.

 यात सरपंच पदी सर्वांना सोबत घेऊन चालणारे तरुण तडफदार उच्च शिक्षित असणारे किरण ज्ञानेश्वर पाटील हाके (किरण भैय्या) तर उपसरपंचपदी  नरहरी संभाजी पाटील शिंदे  यांची निवड करण्यात आली आहे.

 मंगरूळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी किरण ज्ञानेश्वर पाटील हाके त्यांचेच एकमेव नामांकन पत्र दाखल करण्यात आले होते तर ७ सदस्यीय ग्राम पंचायतीच्या सदस्य पदासाठी नरहरी संभाजी पाटील शिंदे, मंगेश प्रभाकर पाटील शिंदे, रामेश्वर पंढरी यानभूरे,शिवमाला मारोती गोपछुडे,सुरेखा विठ्ठल शिंदे, मिरा माधव शिंदे, सविता संग्राम नामुळे यांचेच  प्रत्येकी एक नामांकन पत्र दाखल करण्यात आले होते.

 त्यामुळे सरपंच पदासहीत ७ ग्राम पंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे केवळ आता  औपचारिकता बाकी आहे.

 मंगरूळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच म्हणून किरण भैय्या हाके यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपसरपंच म्हणून नरहरी संभाजी पाटील शिंदे यांचे नाव ठरले आहे.

 यावेळी पॅनल प्रमुख माधव पाटील हाके,प्रभाकर पा शिंदे, हानमंत कदम ज्ञानोबा पा शिंदे,वसंत पा शिंदे किसन शिंदे, सदाशिव आप्पा  गोपचुडे टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष वैभव नितीनराव हाके माजी सरपंच बालाजी शिंदे , विश्वनाथ भारती,बालाजी यानभूरे, माऊली वाघमारे, पांडुरंग नामुळे, बंटि शिंदे रामेश्वर दिगांबर शिंदे, दत्ता शिंदे अंगद शिंदे, भगवान शिंदे, शिवाजी अप्पा गोपछुडे,मारोती गोपचुडे राम पांचाळ दत्ता नामुळे, लक्ष्मण शिंदे,जगन शिंदे, नारायण गुंडेवाड, चंद्रकांत यानभूरे, बालाजी गोपछुडे नागोराव गोपचुडे यांच्यासह समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.

तसेच सदरील निवडणूक बिनविरोधपणे होण्यासाठी धीरज भैया हाके, योगेश गोंटे,वैभव भैय्या हाके यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad