सोशल मिडीयात अडकला तर करिअर शुन्य- कुसुम क्षिरसागर
पंढरपूर सिंहगड मध्ये "इंडियन नेव्हर अगेन निर्भया" या विषयावर मार्गदर्शन
समाजामध्ये वावरत असताना जाणीवपूर्वक एखादी व्यक्ती ञास देत असेल तर पोलिसांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. सद्या मोबाईल चा अतिरिक्त वापर होत असल्याने सायबर गुन्हे वाढत आहेत. स्वतःला जर वाटले समोरचा व्यक्तीचा जाणीवपूर्वक ञास देत असेल तर प्रतिकार द्यायला शिकणे आवश्यक आहे. प्रेम करणे वाईट नाही पण ते कोणत्या वयात, कधी करायचे याची जाणीव असणे आवश्यक आहे. सद्या समाजामध्ये बालविकास खुप मोठ्या प्रमाणात होत आहेत. असे बालविवाह वेळीच रोखणे गरजेच आहे. याशिवाय काॅलेज महाविद्यालयात शिक्षण घेत जात असताना रोडरोमिओ यांचा होणार ञास वेळीच रोखा पोलीस प्रशासन व निर्भया पथक यांच्याशी संपर्क साधल्यास तुम्हास तात्काळ मदत मिळेल. बदनामी होईल म्हणून आई वडील अथवा पोलिसांना सांगण्यास घाबरू नका. सद्या तुमचे वय शिक्षणाचे आहे जर तुम्ही करिअर मध्ये अडकला तर करिअर शुन्य होईल असे मत निर्भया पोलीस कुसुम क्षिरसागर यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर तसेच सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने "इंडियन नेव्हर अगेन निर्भया" या विषयावर निर्भया विषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस कुमारी ऋतुजा गायकवाड व श्रद्धा कुलकर्णी यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले.. स्ञी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रसाद औटी, निर्भाया प्रमुख पोलीस कुसुम क्षिरसागर, मानसोपचार मार्गदर्शक डाॅ. संगिता पाटील, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, पोलीस काॅन्टेबल अरबाज खाटीक, रोटरी क्लब ऑफ पंढरपूर सचिव सचिन भिंगे, रो. शुभांगी शिंदे, सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरमच्या चेअरमन प्रा. अंजली पिसे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ पंढरपूर च्या सद्या डाॅ. संगीता पाटील, पोलीस काॅन्टेबल अरबाज खाटीक, पोलीस नाईक प्रसाद औटी यांनी सायबर क्राईम विषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थिनी सानिया आतार व सुमिञा सांगोलकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे, प्रा. संगिता कुलकर्णी, प्रा. जयमाला हिप्परकर, प्रा. अनिता शिंदे, प्रा. निशा करांडे, प्रा. निखत खान आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.