आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी केली लोहयात होणाऱ्या इन्तेंज्मा मैदानाची पाहणी ; प्रशासनाला सुविधा पुरविण्याच्या दिल्या सुचना

 

आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी केली लोहयात होणाऱ्या इन्तेंज्मा मैदानाची पाहणी ; प्रशासनाला सुविधा पुरविण्याच्या दिल्या सुचना




*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 


लोहा शहरातील कंधार रोडवरील मैदानात दि.६ व ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मैदानाची पाहणी नांदेड दक्षिण चे कार्यसम्राट आ.‌मोहन अण्णा हंबर्डे यांनी आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी पाहणी केली व या कार्यक्रमाला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रशासनाला सुचना दिली.



नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने लोहा येथील कंधार रोडवर दि. ६ व ७ डिसेंबर रोजी इन्जेमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी लाखो मुस्लिम समाज बांधव येणार असून त्यांना प्रशासनाच्या वतीने सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी नांदेड दक्षिण मतदार संघाचे कार्यसम्राट आ.मोहन अण्णा हंबर्डे यांनी या मैदानाची पाहणी केली व महसूल, पोलीस, म.रा. वि. महावितरण , पाणी पुरवठा , नांदेड मनपा , आदी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाला सर्व सोयी सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या .

 यावेळी यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, माजी जिल्हा परिषद सभापती श्रीनिवास बंडेवार, नांदेड मनपाचे माजी उपमहापौर शमीम अब्दुला, नगरसेवक नासेर सेठ, लोहा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे, महावितरणचे अभियंता वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, बंडु मोरे, प्रकाश मोरे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, भूषण दमकोडवार यांच्यासहित अनेक मुस्लिम समाजातील नागरिक, पत्रकार आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad