लोहयात छावा वाहतुक आघाडीची बैठक संपन्न

 

लोहयात छावा वाहतुक आघाडीची बैठक संपन्न 




*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



लोहा येथील शासकीय विश्रामगृहात छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. २९ नोव्हेंबर रोजी छावा वाहतूक संघटनेची बैठक संपन्न झाली.

 यावेळी शालेय विद्यार्थी वाहातुक संघटना अध्यक्ष दयानंद पाटील येवले, उपाध्यक्ष इक्बाल शेख, सचिव हनुमंत बावनपल्ले, सहसचिव गोविंदराव पाटील क्षीरसागर, कोषाध्यक्ष उध्दव पाटील काळे, सहसचिव भिसे मामा, कार्याध्यक्ष रंगनाथ अप्पा,बंडू पाटील येवले, बंटी स्वामी, राहुल ढवळे,माधव पाटील लोखंडे, प्रदीप डाके, आदी उपस्थित होते.

 यावेळी या बैठकीला छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. वाहातूक आघाडीच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले व छावा वाहतूक संघटनेच्या पाठीमागे छावा युवा संघटना खंबिरपणे उभे आहे तेव्हा कुणाच्या दबावाखाली काम करू नका फ्रीडम वागा ग्राहकांना चांगली सेवा द्यावी असे माऊली पाटील पवार म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad