खांबेगाव जि. प. शाळेत सुनेगाव संकुल अंतर्गत शिक्षण परिषद

 

खांबेगाव जि. प. शाळेत सुनेगाव संकुल अंतर्गत शिक्षण परिषद 



* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 


    लोहा तालुक्यातील सुनेगाव केंद्र संकुलातील जि. प. प्रा. शाळा खांबेगाव, सुभाष नगर तांडा, सोनमांजरी तांडा या तिन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने खांबेगाव येथे शिक्षण परिषद बुधवारी पार पडली. सदरील परिषदेस शिक्षण विभागाच्या सुलभकानी आधुनिक व नावीन्यपूर्ण शिक्षण प्रणाली संदर्भाने सखोल माहिती दिली.


                 जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षकांना संभाव्य शिक्षण प्रक्रियेतील अडीअडचणी दूर व्हाव्यात, विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून लोहा तालुक्यातील सुनेगाव केंद्र संकुलातील जि. प. प्रा. शाळा खांबेगाव, सुभाषनगर तांडा, सोनमांजरी तांडा यांच्या संयुक्त विद्यमाने खांबेगाव जि. प. प्रा. शाळा प्रांगणात बुधवारी दि. ३० रोजी शिक्षण परिषद भरविण्यात आली होती. सदरील परिषदेस अध्यक्ष म्हणून केंद्र प्रमुख मदन नायके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खांबेगावचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पाटील हिलाल, चेअरमन नागेश पाटील हिलाल, पो. पा. दत्ता मुळे, सोनमांजरी तांडाचे शालेय समिती अध्यक्ष गणेश पवार आदींची उपस्थिती होती. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिषदेस प्रारंभ करण्यात आले.  

           सदरील शिक्षण परिषदेस सुलभक परमेश्वर तिडके यांनी निपुण भारत अंतर्गत माता पालक गट तसेच आधुनिक शिक्षण प्रणाली संदर्भाने मार्गदर्शन केले. रमेश पाटील पवार यांनी बालरक्षक व त्याचा कायदा आणि त्याचे संगणकीय संदर्भातील माहिती तसेच विद्या अमृत महोत्सव यासंदर्भात मार्गदर्शन केले. बी. एम. जाधव यांनी नावीन्यपूर्ण अद्यापन पद्धतीचा वापर तसेच अध्ययन व अद्यापन पद्धती प्रभावीपणे राबविणे आदी संदर्भातील मार्गदर्शन केले.


          जि. प. खांबेगाव शाळेचे मुख्याध्यापक मुर्तुजा शेख, सुभाषनगर तांड्याचे मुख्याध्यापक शिवराज सोनवळे, सोनमांजरी तांड्याचे मुख्याध्यापक संभाजी केंद्रे आदींनी शिक्षण परिषदेचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पवार यांनी तर आभार उषा मद्रेवर यांनी मानले. यशवितेसाठी भोजु चव्हाण, संगीता राठोड आदींनी परिश्रम घेतले. सदर परिषदेस संकुलातील बहुसंख्य शिक्षकांची उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad