लोह्यातील देऊळगल्लीत दत्त जयंती महोत्सवास
भक्ती ज्ञान प्रसादाचा लाभ घ्यावा- लक्ष्मीकांत प्रभु महाराज लोहेकर
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी लोहा शहरातील देऊळगल्ली येथील सद्गुरु धाम,श्री दत्त मंदिर,दत्त संस्थानच्या वतीने श्री दत्त जयंती महोत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असून श्री साधु महाराज,सखाराम महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचारी महाराज, गुरूवर्य श्री प्रभु महाराज यांच्या कृपेने दि.०२ डिसेंबर २०२२ (मार्गशीर्ष शुद्ध १० शुक्रवार पासून महोत्सवास सुरुवात झाली.नियमितपणे दररोज सकाळी ४.३०ते ५.३०काकडा आरती,५.३० ते ७.३० दत्त मुर्तीस अभिषेक,८.३० ते ९.३०गीता पारायण,१०.०० ते१२.०० गाथा भजन, दुपारी १.०० वाजता श्रीदत्त मुर्ती स महानैवेद्य, आरती, दुपारी ४.३०ते ५.३० ज्ञानेश्वरी प्रवचन श्री ह.भ.प.गुरूवर्य लक्ष्मीकांत प्रभु महाराज लोहेकर यांचे होईल,सायंकाळी ६.०० ते ७.००हरिपाठ धुपारती तसेच नियमीतपणे ८.३० ते १०.३० हरिकिर्तन अशा प्रकारे सप्ताहातील नित्य कार्यक्रम होत आहेत. सप्ताह प्रारंभ दि.२ डिसेंबर २०२२पासून दि.९ डिसेंबर २०२२ पर्यंत किर्तन सेवा अनुक्रमे ह.भ.प. आत्माराम महाराज रायवाडीकर,ह.भ.प भालेराव महाराज महागावकर,ह.भ.प.शिवप्रसाद महाराज हांडे,ह.भ.प चिंतामणी महाराज गंगाखेडकर,ह.भ.प.एकनाथ महाराज आळंदीकर, तसेच दि.७डिसेंबर २०२२ रोजी दत्त जन्माचे गुलालाचे किर्तन ह.भ.प.श्री गुरूवर्य लक्ष्मीकांत प्रभु महाराज लोहेकर यांचे सकाळी १०.०० ते १२.००वेळेत होईल तदनंतर रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत ह.भ.प.भागवताचार्य श्री दिपक गुरू पांगरेकर,दि.८ डिसेंबर रोजी ह.भ.प.श्री तुकाराम महाराज चव्हाण गाथा पुजेचे किर्तन सकाळी १०.०० ते १२.०० वेळेत तर रात्री नियमितपणे ह.भ.प.श्री ओमकारनाथ महाराज साधु कंधारकर यांचे तर दि.९ डिसेंबर २०२२ रोजी शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत ह.भ.प.श्री गुरूवर्य लक्ष्मीकांत प्रभु महाराज लोहेकर यांचे काल्याचे किर्तन होईल.
श्री दत्त जयंती मुख्य दिवस मार्गशीर्ष शुद्ध १४, बुधवार दि.७डिसेंबर २०२२ रोजी असून सदरील दत्त जयंती महोत्सवास टाळकरी लोहा हळदव,धावरी,कारेगांव, पिंपळगाव (ढगे), धानोरा (म.), शेवडी (बा.),आंडगा येथील असून यांसह असंख्य भाविक भक्तांनी उत्सवात सहभागी होवून भक्ती ज्ञान प्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री सद्गुरू धाम श्री दत्त मंदिर देऊळगल्ली दत्ता संस्थानच्या कडून ह.भ.प.श्री लक्ष्मीकांत प्रभु महाराज लोहेकर यांनी कळविले.