राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर *पत्रकार सुरक्षा समितीचे आंदोलन

 राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर

*पत्रकार सुरक्षा समितीचे आंदोलन



सोलापूर (प्रतिनिधी )



 राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी उत्कर्षासाठी विकासासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेली अनेक वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य सरकारकडे अनेक वेळा निवेदने पत्र व्यवहार करून देखील राज्य सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यास तयार नसल्याने राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने

*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*

 *ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*

*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी*

 *राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*

*यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती* *राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना*

*कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत* या सह शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार सुरक्षा समिती काम करीत असून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन करण्यात आले.

*आपल्या न्याय हक्कासाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरावे लागते ही बाब खेदाची असल्याची टीका करून प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यसरकर वर टीकास्त्र सोडले असून राज्य सरकारने तात्काळ राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे*

यावेळी जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार जिल्हा संपर्क प्रमुख कादर शेख जिल्हा उपाध्यक्ष सादिक कायदेशीर सल्लागार ऍड दिलीप जगताप शहराध्यक्ष राम हुंडारे शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) शहर संघटक श्रीकांत कोळी शहर प्रसिद्धीप्रमुख अक्षय बबलाद बाळकृष्ण सदाफुले आदर्श धडे मल्लिनाथ कोळी इमाम हुसेन शेख रोहित घोडके व्हनकडे प्रवीण राठोड संतोष म्हेत्रे शोएब काजी इत्यादी पत्रकार उपस्थित होते यावेळी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad