डॉ.सचिन गवळी सर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते -प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे* स्वेरीत डॉ.सचिन गवळी यांना वाहिली श्रद्धांजली

                                                                                                             

*डॉ.सचिन गवळी सर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते                                                             -प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे*


स्वेरीत डॉ.सचिन गवळी यांना वाहिली श्रद्धांजली




पंढरपूर- ‘कोणतेही शैक्षणिक कार्य असो अथवा सामाजिक उपक्रम असो, ते स्विकारण्यासाठी व यशस्वीरित्या पूर्ण करण्यात कै. डॉ. सचिन गवळी हे अग्रेसर असत. शिक्षण क्षेत्रातील नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची त्यांची तळमळ वाखाणण्यासारखी होती. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून संध्याकाळी घरी जाईपर्यंत विद्यार्थ्यांच्या गोतावळ्यात ते राहायचे. विद्यार्थ्यांना कोणती अडचण असेल तर ते अखेरपर्यंत पाठपुरावा करून प्रश्न सोडवायचे. त्यांच्या कामाची पद्धत ही अनुकरणीय होती. एकूणच कै.डॉ.सचिन गवळी सर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.’ असे प्रतिपादन गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले. 

      स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सचिन रामचंद्र गवळी यांचे काल रात्री अकस्मात निधन झाले. या निमित्ताने स्वेरीमध्ये शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे हे डॉ. गवळी सरांच्या कार्यावर प्रकाश टाकत होते. कै. डॉ.सचिन गवळी यांच्या प्रतिमा पुजनानंतर डॉ. यशपाल खेडकर यांनी कै. डॉ. गवळी यांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर म्हणाले की ‘डॉ. गवळी सर सदा हसतमुख असायचे, समाधानाने कार्य करायचे, आपल्या कार्यात ते मग्न असायचे कोणतीही जबाबदारी ते उत्तमरीत्या सांभाळायचे. त्याचबरोबर आयआयसी मेंबर सुहास देशपांडे, स्वेरीचे सचिव डॉ. सुरज रोंगे, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, कै. डॉ.सचिन गवळी सरांचे पीएच.डी. शिक्षण घेताना मार्गदर्शक असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ.डी.ए. तंबोळी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले, विद्यार्थी सूरज लंगोटे, विद्यार्थिनी गौरी महाजन व सिद्धी भोसले यांनी देखील सहवेदना व्यक्त केल्या. डॉ. यशपाल खेडकर हे कै. डॉ.सचिन गवळी यांच्या जीवनावर भाष्य करताना म्हणाले की, ‘आदर्श गुरु, उत्कृष्ट प्रशासक, विद्यार्थीप्रिय सच्चा शिक्षक, संयमी मार्गदर्शक, उमदा माणूस, कुटुंबवत्सल पिता, पुत्र आणि ज्येष्ठ बंधुसम आधार हरपला.’ असे सांगून श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad