जिल्हा परिषद अध्यक्षा प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मान व्हावा – वर्षा ठाकुर

जिल्हा परिषद अध्यक्षा प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मान व्हावा – वर्षा ठाकुर




*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 


माळेगाव यात्रेत यावर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष नसल्याने दरवर्षी ज्या पद्धतीने जिल्हा परिषद अध्यक्षांना मानसन्मान दिल्या जातो त्याच पद्धतीचा मान सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मिळाला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी माळेगाव येथे आयोजित यात्रा नियोजन संदर्भात बैठकीत केले.

या बैठकीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे ,प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले, उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद कुमार मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,यात्रा कमिटीचे सचिव डॉ सुधीर ठोंबरे उपविभागीय पोलीस अधिकारी बालाजी थोरात , पि आय डोके, पो हे का रमाकांत कदम,जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे , जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ बोधनकर, महावितरण चे अभियंता दवंडे , वित्त अधिकारी चन्ना, गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे विस्तार अधिकारी गायकवाड ,तालुका कृषी अधिकारी सदानंद पोटपल्लेवार ,बाल विकास प्रकल्प अधिकारी चटलावार, सहकारी सोसायटीचे सदस्य विजयकुमार वाघमारे ,सरपंच प्रतिनिधी धुळगंडे ,ग्रामविकास अधिकारी संभाजी धुळगुंडे, बालाजी नंदाने ,यासह गावातील चेअरमन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने अख्या जगात धुमाकूळ घातल्यामुळे यात्रा ही होऊ शकली नाही परंतु आता सर्व निर्बंध उठवल्याने माळेगावची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे त्या संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती हे कामाला लागले आहेत त्यामुळे त्यांनी नांदेड येथे पहिली बैठक घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यात्रे संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर आजही दुसरी बैठक माळेगाव यात्रेत पार पडली त्या यात्रेच्या बैठकीत बोलताना वर्षा ठाकूर घुगे या म्हणाल्या की माळेगाव यात्रेत ज्या पद्धतीने जिल्हा परिषद अध्यक्षांचा सन्मान केला जातो त्याच पद्धतीने माझा देखील सन्मान असे मत त्यांनी मांडले त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने या माळेगाव यात्रेचे नियोजन करावे प्रत्येक विभाग प्रमुखाला त्यांनी सूचना दिल्या की यात्रेत शासनाच्या विविध माहिती देणारे स्टॉल उभारावेत जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या विविध योजनेची या माध्यमातून माहिती मिळणार आहे आणि त्यातून शासन योजना आपोआपच ग्रामीण भागात पोहोचणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.


यावर्षी प्रथमच यात्रेमध्ये पदाधिकारी यांचा वावर नसल्याने माळेगाव यात्रेच्या इतिहासात प्रथमच माळेगाव येथे नियोजन संदर्भातली बैठक ही बंदिस्त हॉलमध्ये घेण्यात आली. सर्व माळेगाव यात्रेचे नियोजन हे अधिकाऱ्यांच्या हातात गेल्यामुळे त्यांच्यावर आता कोणाचेही नियंत्रण नसल्याने प्रथमच ही यात्रा पदाधिकारी मुक्त होणार असल्याने अधिकारी आता कशा पद्धतीने माळेगावची यात्रा यशस्वी करतायत की यात्रेत लोकांचा रोष ओढवून घेताय हे येणाऱ्या काही दिवसात कळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad