*खैरगाव देशमुख ग्राम पंचायत ता केळापूर जि. यवतमाळ येथे आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड वितरणाचे शिबीर*
*रुग्ण सेवक सुरेंद्र इरपनवार यांच्या नेतृत्वाखाली गोल्डन कार्ड चे शिबीर आयोजित केले*
केळापूर तालुक्यातील खैरगाव देशमुख या गावी आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या संदर्भात माहिती आणि या गोल्डन कार्ड चे शिबिर आयोजित केले. श्री विनोद बोरटवार यांनी प्रास्ताविक माहिती दिली. आजच्या शिबिरामध्ये सरपंच श्रीमती संगीता कुळसंगे यांनी श्री सुरेंद्र इरपणवार यांचा ग्रामपंचायतिच्या वतीने शाल् व श्रीफळ देवून सत्कार केले. त्यानंतर योजनेचे जिल्हा समनव्यक सुरेंद्र इरपनवार यांनी गावातिल् नागरिकांना आयुष्मान भारत योजने बद्दल संपूर्ण माहिती दिली. आणि या योजनेत समाविष्ट असलेले यवतमाळ जिल्ह्यातील रूग्णालया बद्दल माहिती सांगीतलि . आयुष्मान भारत योजनेचं या योजनेत एकूण 1209 प्रकारचे आजार समाविष्ट आहे. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 26 रूग्णालय सवलग्नित आहे. या योजनेत कॅन्सर, गर्भ पिशवीचे आजार,सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, डायलीसिस, दुर्धर आजार, सांध्ये प्रत्यारोपन, सारखे मोठे शस्त्र क्रिया समाविष्ट आहे, आजच्या शिबिरामध्ये यांच्या सोबत गट विकास अधिकारी श्री विठ्ठल जाधव, श्री विनोद बोरटवार ,सरपंच श्रीमती संगीता कुळसंगे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल तायडे, तलाठी श्री सुनील जाधव, ग्रामसेवक श्री संतोष वाढई आणी ग्रामपंचायत संगणक संचालक रविकांत राठोड व CSC चे साहिल शेख उपस्थीत होते . सुरेंद्र इरपनवार यांनी गावातील सर्व पात्र नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावे अशी विनंती दरशवली.
*यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-शुभम बावणे.*