*वै.वटेमोड महाराजांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी : डॉ.धोंडिराम वाडकर* *वै. धर्मभूषण वटेमोड महाराज यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने विठूमाऊली प्रतिष्ठाणचा उद्घाटन समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

 

*वै.वटेमोड महाराजांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी : डॉ.धोंडिराम वाडकर* 


*वै. धर्मभूषण वटेमोड महाराज यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने विठूमाऊली प्रतिष्ठाणचा उद्घाटन समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न* 


 


----------------------------------- -------

* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार * 



 वै.वटेमोड महाराजांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त खैरकावाडी (गोकूळवाडी) येथे विठूमाऊली प्रतिष्ठापनाची स्थापना करण्यात आली, यावेळी इयत्ता १० वी १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा व सेवाभावी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

           वै.वटेमोड महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी समाजात नवचैतन्य निर्माण केले. समाजामधील वाईट चालीरीती.

अज्ञान अंधश्रद्धा बाजूला सारून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले,म्हणूनच वै. वटेमोड महाराजांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी आहेत,असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.धोंडीराम वाडकर यांनी मांडले.

तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री शिवाजी कोनापूरे यांनी वै.वटेमोड महाराज आणि त्यांचा जीवन प्रवास याविषयी सविस्तर माहिती दिली. 

.डॉ.रंजित काळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.महंत माधव पुरी यांनी पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यातील साधर्म्य साधून विद्यार्थ्यांशी संवाद साधले, प्रा.सुभाष हिवराळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मोठे स्वप्न पाहून चालत नाही, तर प्रत्यक्ष कृती करून आपली ध्येय गाठावे, मुलीनी प्रतिगामी विचार सोडून पुरोगामी विचारांची कास धरून जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या आई-वडिलांची व देशाची नाव करावे असे सांगितले 

अविनाश तलवारे सरांनी प्राचीन संस्कृती विषयी माहिती दिली तर हानमंत आटोळकर यांनी अध्यात्म व शिक्षण यांची सांगड घालून तसेच आज समाजात वाढलेला ढोंगीपणा, परखडपणे सांगून उपस्थितांची मने जिंकली. तसेच माधव गोटमवाड यांनी विद्यार्थांना येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षे शिवाय पर्याय नाही , हे स्पष्ट करून दाखवले, 




           विठूमाऊली प्रतिष्ठान व ग्रामस्थ गोकुळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी तसेच मातृभूमी गोकुळवाडी येथे अधिकारी व कर्मचारी ,जेष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार करण्यात आला. गोकुळवाडी हे गाव एक छोटीशी वस्ती असून या छोट्याशा गावातून अधिकारी कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी घडले. ह,भ,प धर्मभूषण वटेमोड महाराज राष्ट्रपती पुरस्कृत असून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी येथे भव्य हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली .गावांमध्ये सर्व भाविक भक्त राहत असून अशा पावन भूमीमध्ये धर्मभूषण वटेमोड महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विठूमाऊली प्रतिष्ठान व ग्रामस्थ गोकुळवाडी संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थी यांचे सत्कार करण्यात आले.विद्यार्थ्यांनी अधिकारी व कर्मचारी होऊन त्यांनी कर्तव्याचे ठिकाणी आपले कर्तव्य निष्ठेने कार्य बजावून गावाचे नाव लौकिक करतील अशा गुणवंताचा सत्कार अध्यक्ष व सत्कारमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले .  

       प्रा. विठ्ठल बरसमवाड यांनी अहमदनगर येथे प्रा. म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी तयार केले तसेच त्यांनी आजतागायत 7 पुस्तके व 129 लेख लिहले व 100 च्यीवर व्याख्यान करून त्यांनी आपल्या लेखणीतून कर्तव्यनिष्ठा व सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केले हे गोल्ला गोलेवार समाजासाठी अभिमानाची बाब आहे.विशेष म्हणजे प्रा.विठ्ठल बरसमवाड यांना तीन पुरस्कार मिळाले आहेत .

          यावेळी ज्येष्ठ नागरिक श्रीमती गंगाबाई मारोती शिरबरतळ ,श्रीमती

राजाबाई बाबाराव शिरबरतळ, घंटेवाड दत्तात्रय मारुती, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गोल्ला,गोलेवार गोकुळवाडी शाखाप्रमुख श्री गोविंद शंकर शिरबरतळ , तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत खंडेश्वर विठ्ठल नकुलवाड हा पात्र झाला ,गुणवंत विद्यार्थी म्हणून शंकर विनायक शिरबरतळ, कपिल मारोती शिरबरतळ, कु. बरसमवाड मुक्ताई प्रकाश, कु. वैष्णवी माधव शिरबरतळ, पार्वती सायबु नाईकवाड,

राजेश संभाजी शिरबरतळ, यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्या, सौ,अनुसयाबाई संभाजी शिरबरतळ, सौ, हारूबाई पांडुरंग आयतलवाड,प्रतिष्ठीत नागरिक 

सायबु संभाजी शिरबरतळ, श्री गंगाराम बाबाराव शिरबरतळ,श्रीमती लक्ष्मीबाई गणपत बरसमवाड मोगलाजी गणपत बरसमवाड सेवानिवृत्त पोलिस श्री गंगाराम मारोती घंटेवाड, श्री कालिदास वैजेनाथ शिरबरतळ, विनायक सटवाजी शिरबरतळ, प्रल्हाद नारायण शिरबरतळ, प्रल्हाद पांडुरंग बरसमवाड, विठ्ठल उमाजी आयतलवाड, दिगंबर तेलंगे ( आधार न्युज) , विशाल बेळीकर (सिद्धतीर्थधाम फोटो स्टुडिओ मुखेड) हे हजर होते, 

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विठ्ठल बरसमवाड यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल शिरबरतळ व आभार सौ. कल्याणी विठ्ठल यांनी मांडले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad