सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद* जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम

 *सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद*

जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम

 


सोलापूर, दि. 31 (जिमाका) : एकसंघ भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केंद्र शासनाच्या वतीने “एकतेचा उत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन, सोलापूर, जिल्हा क्रिडा अधिकारी, नेहरू युवा केंद्र संघटन  आणि  माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आज सकाळी 7.00 वाजता हुतात्मा चौक ते शासकीय विश्रामगृह सात रस्ता अशा जिल्हास्तरीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. एकता दौडला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



एकता दौडला पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितिन तारळकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, पोलीस उपायुक्त बापू बांगर, दिपाली धाटे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारतीय, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राजुरकर, जिल्हा युवा अधिकारी अजीतकुमार, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितिन थेटे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश सातपुते, डॉ. विक्रम दबडे, डॉ.स्वप्निल कोठाडिया, विश्वास बिराजदार आणि सतीश घोडके उपस्थित होते.



कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बॅँड पथकाद्वारे राष्ट्रगीताने करण्यात आली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्वांना राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित ठेवण्याची शपथ दिली. पोलीस बॅंड पथकाच्या विविध संगीत स्वराने संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. एकता दौडमध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, सोलापूर रनर्स असोसिएशन, राज्य राखीव पोलीस दलातील जवान, क्यू.आर.टी. दल, एस.आर. पोलीस प्रशिक्षण केंद्र, उत्कर्ष क्रीडा मंडल, स्वामी समर्थ प्रशिक्षण केंद्र, शहरातील विविध सामाजिक व क्रिडा संस्था, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. दौडचा समारोप सात रस्ता येथे झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad