*राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत डॉ.सूर्यकांत पवार यांचे सुवर्णपदक*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा तालुक्यातील पारडी येथील रहिवासी सोनखेड येथील लोकमान्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ सुर्यकांत पवार यांनी महाराष्ट्र स्टेट व्हेटरन्स अक्वॅटिक असोसिएशन आणि गोदावरी मास्टर अक्वॅटिक असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नुकत्याच संपन्न झालेल्या दोन दिवसीय जलतरण स्पर्धेत त्यांनी ५० मीटर फ्री स्टाईल मध्ये कास्यपदक आणि २०० मीटर आय.एम. मध्ये सुवर्णपदक पटकावले.
नुकत्याच दि.८ व ९ ऑक्टोबर २०२२ या दोन दिवसीय संपन्न झालेल्या जलतरण स्पर्धेत दुहेरी सुवर्ण व कांस्यपदकासह दुहेरी यश संपादन करत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
प्रा.डॉ.सूर्यकांत पवार हे अर्थशास्त्र विषयाच्या अध्ययन आणि अध्यापन बरोबरच त्यांनी आपल्या खेळाचाही छंद जोपासत आतापर्यंत विविध क्षेत्रातील खेळामध्ये नेत्र दीपक कामगिरी करून अनेक पदकांचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला.यापुर्वी विद्यार्थी दशेत असताना त्यांनी अनेक क्रीडा स्पर्धेत तालुका,जिल्हास्तरावर,आंतरमहावि द्यालयीन,राज्यस्तर,राष्ट्रीय स्तरावर उज्वल यशाची परंपरा कायम राखत नावलौकिक मिळविला.
त्यांच्या या यशाबद्दल विशेषतः लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथील त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी सूर्यकांत पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना पुढील स्पर्धात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परिक्षेत्रातील असंख्य सहकारी मित्र परिवाराने,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे तोंडभरून कौतुक करत प्रा.डॉ.सुर्यकांत पवार भावी कार्यास शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.