'स्वेरी' अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांची ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मध्ये निवड
आत्तापर्यंत ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसस' मध्ये स्वेरीच्या तब्बल ४६२ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड
पंढरपूरः येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्युद्वारे ६८ विद्यार्थ्यांची निवड झाली असून आत्तापर्यंत टी.सी.एस. मध्ये स्वेरीच्या एकूण ४६२ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' या बहुराष्ट्रीय व नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून तब्बल ६८ विद्यार्थ्यांची निवड केली. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून काव्यांजली चंद्रकांत मंगरुळे, अभिषेक महेश आराध्ये, शिवानी राजेश आवताडे, रसिका विष्णू गिरवीकर, क्षितिजा मिलिंद फासे, मधुरा मिलिंद बडवे, जयदीप प्रदिप जाधव, प्रतिक सुभाष देशपांडे, सौरभ राजेश वाघुले, गौरी प्रमोद कुलकर्णी, ऐश्वर्या दत्तात्रय तोडकरी, दीक्षा दिगंबर लाळे, रसिका अखिलेश वेळापुरे, प्रिया प्रशांत कचरे, प्रशांत जगन्नाथ जलगिरे, चेतन रमेश क्षीरसागर, सिद्धी बालाजी शितोळे, गौरव राजेंद्र वाघमारे, स्नेहल सुरेश पुजारी, काजल बापू खराडे, पूजा मोहन दांडगे, प्रणेश प्रकाश सुतार, फिझा सैफन शेख, सलोनी आगतराव गावडे, वैष्णवी ज्ञानेश्वर जगनाडे, सोनिया शरद कागदे, गीतेश्वरी अनिल शिंदे, आदित्य दत्तात्रय धायफुले, विविता कृष्णदेव ढेकळे, सानिका रमेश व्यवहारे, विश्वजीत उदय राजोपाध्ये, विवेक महेश निकते, ऋत्विज कांतीलाल बुबणे, ओंकार संजय पवार,नवीन अमोल मदुर, योगेश भास्कर डोंगरे, क्षिप्रा विद्याधर कुरणावळ, अबोली संजय अडसूळ, प्रतिक अनिल वाळूजकर, वैष्णवी अशोक गोटे, प्राजक्ता दत्तात्रय कुलकर्णी, केतकी भास्कर देशपांडे, प्रसन्न मन्मथ लुंगरे, निकिता संभाजी भोसले, गिरीधर गुणपाल शेट्टीगर, वैष्णवी झुंबर सुरवसे, जयेश संतोष खड्डे, ऋषिकेश पितांबर देशमुख, ओंकार मुकुंद लाड, ईश्वरी गोविंद शेळके, धनराज संजय भोसले, सौरभ दत्तात्रय मुळे, श्रध्दा अर्जुन अंबुळे,आकाश प्रसाद अजगर, प्रथमेश रमेश किरगत, निलेश संजय कदम, सचिन अशोक क्षीरसागर, वैभव नानासाहेब गायकवाड, ओंकार संजय पाटील, युवराज विनोद शेलार, दिपक पांडुरंग शिंदे, दीपज्योती दत्तात्रय साठे, सूरज दत्तात्रय मोरे, गणेश शंकर तोडकर, सौरभ बंडू कडसरे, अथर्व संतोष जोशी, सुनील अंबादास सादुल व योगेश सम्रुत आवताडे अशा मिळून स्वेरीच्या एकूण ६८ विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना वार्षिक ३.३६ लाख रुपये पॅकेज मिळाले आहे. या कंपनीत गतवर्षी पर्यंत स्वेरीच्या ३९४ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली होती. त्यात आता या नवीन ६८ विद्यार्थ्यांची भर पडली असून टी.सी.एस. कंपनीत आतापर्यंत विक्रमी ४६२ जणांची निवड झाली आहे. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकीमधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वेरीचे विद्यार्थी आज विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यात आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. ‘स्वेरी’ मधून विविध कंपन्यात प्लेस होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत स्वतंत्रपणे कुशल प्रशिक्षकांद्वारे एप्टीट्युड, कम्युनिकेशन स्कील, टेक्निकल स्कील, विविध सॉफ्टवेअर्स, मॉक इंटरव्युव्ह यांचे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते. मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव असताना देखील कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तब्बल ६०० पेक्षा अधिक नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यात आल्या. या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे स्वेरीने प्रवेश प्रक्रियेत व वार्षिक परीक्षेच्या निकालात मारलेली गरुड झेप दिसून येते तर दुसरीकडे स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’चे ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.