"पीएम - किसान "योजनेतील शिल्लक लाभार्थ्यांचे आधार लिंक करून घेण्यासाठी तालुक्यातील क्षेत्रीय कर्मचारी व CSC सेंटरचालक यांनी पुन्हा पुढाकार घ्यावा- तहसीलदार व्यंकटेश मुंडे
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा तालुक्यातील पात्र लाभार्त्यांनी पीएम -किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या बँक बचत खात्याला आधार लिंक करणे अनिवार्य आहे हे आपल्याला सर्वाना माहिती आहे.
इ-केवायसी 'कारणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे . Ekyc आधार लिंक न करणारे शेतकरी हे पात्र असुनही त्या शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार नाही .
तरी आपल्या तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक केले नाही त्यांनी करून घेणे आवश्यक आहे.
येणारे दोन दिवसात लाभार्त्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक अर्थात ई-केवायसी करून घ्यावे , अन्यथा या लाभार्थ्यांना या योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही.
लोहा तालुक्यातील तब्बल ६००० शेतकरी यांनी मागील १० दिवसात आधार लिंक केले आहे , यासाठी तलाठी कृषी सहायक , ग्रामसेवक व CSC सेतु सेंटर यांनी कौतुकास्पद प्रयत्न केलेमुळे झाले असुन अदयाप सुमारे नऊ हजार शेतकरी यांचे Ekyc आधार लिंक करणे बाकी आहे.
मोबाईलवरील Pmkisam योजना पोर्टलवर हे लिंकीग करता येते .तसेच सीएससी केंद्रावर जाऊन देखील पात्र शेतकरी पीएम -किसान योजनेसाठी आधार लिंक करु शकतात .
आधार लिंकिंक सध्या चालु आहे.
तेव्हा आपले गावातील व भागातील ज्या शेतकरी लाभार्थ्यांचे बँक खात्याला आधार लिंक केले नाही त्यांचे ekyc आधार लिंक येत्या दोन दिवसात CSC सेतु सेंटर धारक व गावातील सर्व क्षेत्त्रीय कर्मचारी यांनी तात्काळ करून घेणयासाठी शेतकरी यांना गावागावात दंवडीद्वार् व सोशल मेडीयाद्वारे विशेष आवाहन करुन जास्तीत जास्त आधार लिंकीकसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सर्वांना व्यंकटेश मुंडे तहसिलदार लोहा यांचेकडुन पुन्हा करण्यात येत आहे.