लोहयात भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने अमृता फडणवीस यांचे जंगी स्वागत ---------------------------------------- *नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*

 


लोहयात भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने अमृता फडणवीस यांचे जंगी स्वागत 

----------------------------------------



*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 


 भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्धांगिनी तथा प्रसिद्ध सुप्रसिद्ध गायिका अमृता फडणीस यांचे लोहयात भाजपा व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

 अमृता फडणीस या नांदेडहून लोहा मार्गे गंगाखेडकडे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांचा ताफा लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला असता यावेळी लोहा तालुका भाजपा व तालुका भाजपा मोर्चाच्या वतीने लोहा शहरांच्या परंपरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून, फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून भव्य जंगी स्वागत करण्यात आले.

 यावेळी भाजपाचे युवानेते तथा जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, सौ. वैशालीताई प्रविण पाटील चिखलीकर, भाजपाचे लोहा तालुकाध्यक्ष आनंद पाटील शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, उपनगराध्यक्ष दत्ता भाऊ वाले, गटनेते करीम शेख, जेष्ठ नगरसेवक केशवराव मुकादम, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष अर्जुन राठोड,नगरसेवक छत्रपती धुतमल, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक नारायण येलरवाड, नगरसेविका सौ. कल्पनाताई मुकादम, पं.स. सदस्या सौ. सुरेखाताई वाले ,माजी नगरसेविका सौ. शोभाताई बगडे , माजी पं.स. सभापती खुशालराव पाटील, सचिन मुकादम, दिपक पाटील कानवटे, अविनाश पवार ,बाळू पवार ,बी‌ .डी‌ .जाधव,पोलीस पाटील जाधव, सरपंच मारोती कदम यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 यावेळी जेष्ठ नगरसेवक केशवराव मुकादम, भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे यांनी अमृता फडवणीस यांना म्हणाले लोहयाला एखाद्या कार्यक्रमाला या यावेळी सौ. अमृता फडणीस यांनी लोहा वासियांचे निमंत्रण स्वीकारले व त्या म्हणाल्या लोहयाला मी अवश्य येईल एखादा कार्यक्रम ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad