मेस्टा ची पहिली मराठवाडा स्तरीय शिक्षण परिषद 18 सप्टेंबर रोजी लोह्यात ; खा चिखलीकर यांच्या हस्ते उदघाटन , तीनशेहुन अधिक इंग्लिश स्कुल संचालक उपस्थित राहणार

 

मेस्टा ची पहिली मराठवाडा स्तरीय शिक्षण परिषद 18 सप्टेंबर रोजी लोह्यात ; खा चिखलीकर यांच्या हस्ते उदघाटन  



, तीनशेहुन अधिक इंग्लिश स्कुल संचालक उपस्थित राहणार

-----------------



*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*

 


राज्यातील इंग्लिश स्कूल चालविणाऱ्या संस्थाचालक यांची मेस्टा संघटना कार्यरत आहे. या संस्थेची पाहिली मराठवाडा स्तरीय शिक्षण परिषद सह्याद्री इंग्लिश स्कुल पारडी येथे १८ ऑगस्ट रोजी होत आहे.जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन होणार असून "मेस्टा' चे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील हे अध्यक्ष स्थानी राहणार आहेत



  मेस्टा ही स्वयं अर्थसायित इंग्रजी माध्यमांच्या संस्था चालकांची संघटना आहे .मराठवाडा स्तरीय पहिली शिक्षण परिषद लोहा शहराच्या जवळ सह्याद्री इंग्लिश स्कूल, पार्डी ता. रविवार, दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत संपन्न होत आहे

      पहिल्या शिक्षण परिषदेचे उद्घाटन जिल्ह्याचे म खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे परिषदेच्या , अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील हे राहणार आहेतप्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्यामसुंदर शिंदे, नांदेड दक्षिणचे चे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे .लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ गणपतराव मोरे , राज्य कर उपायुक्त ( जीएसटी) एकनाथराव पावडे, लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष .सुधाकर तेलंग सहायक शिक्षण संचालक , दत्तात्रय मठपती ( ,लातूर) नांदेडचे शिक्षणाधिकारी (मा) प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी ( प्रा) . सविता बिरगे. मेस्टा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा डॉ नामदेव दळवी , मराठवाडा कार्याध्यक्ष , विजय पवार, प्रदेश संघटक , अनिल आसलकर, प्रदेश कोषाध्यक्षमनीष हांडे, विदर्भ विभागाचे अध्यक्ष . अभिजीत देशमुख , मराठवाडा अध्यक्ष . गणेश मेड, आदी, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार .उदघाटना नंतर दुसऱ्या सत्रात इंग्रजी माध्यम शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे.या परिषदेला तीनशेहून अधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविणारे संचालक यांनी नोंदणी केली आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मेस्टा चे राज्य संघटक प्रा .सुदर्शन शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी उमाटे, मराठवाडा सचिव भारत होकर्णे आणि जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी केले आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad