लोहयातील वार्ड क्रमांक १५ च्या युवासेना शाखा प्रमुख पदी विलास कहाळेकर यांची निवड

 


लोहयातील वार्ड क्रमांक १५ च्या युवासेना शाखा प्रमुख पदी विलास कहाळेकर यांची निवड


----------------------------------------

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



लोहा शहरातील जुना लोहा येथील कहाळेकर गल्ली,नवी आबादी वार्ड क्रमांक १५ च्या शिवसेना प्रणित युवा सेनेच्या शाखाध्यक्ष पदी  विलास कहाळेकर यांची निवड करण्यात आली असून युवासेनेच्या शाखा फलकाचे अनावरण युवासेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई,व शिवसेनेचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
 विलास कहाळेकर यांचे कहाळेकर घराणे हे लोहा शहरातील एक प्रतिष्ठित घराणे असुन त्यांचे काका सुप्रसिद्ध साहित्यिक शेषराव कहाळेकर असुन ते गत वर्षभरापासून शिवसेनेशी व माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्याशी एकनिष्ठ असुन  विलास कहाळेकर यांच्यावर  माजी आमदार  रोहीदास चव्हाण ,पं. स. सदस्य नवनाथ (बापू) चव्हाण यांनी विश्वास टाकून त्यांची युवा सेनेच्या शाखाध्यक्ष पदी निवड केली आहे युवासेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई व माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या हस्ते शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
 यावेळी पं.स. सदस्य नवनाथ (बापू) चव्हाण, जेष्ठ साहित्यिक शेषराव कहाळेकर,  नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास कहाळेकर, बालाजी गाडेकर, धनंजय बोरगांवकर, आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.