लोहा तालुक्यात लंपी आजाराची साथ नाही तरी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपायोजना सुरू - डॉ. पुरी
---------------------------------------
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा तालुक्यातील जनावरांना लंपी आजाराची साथ नसुन तरी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपायोजना सुरू आहे अशी माहिती पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.पुरी यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.पुरी म्हणाले की, लंपी आजाराची साथ व एक ही जनावर आपल्या लोहा तालुक्यात नाहीत परंतु आपल्या शेजारील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात लंपी आजाराची जनावरे आढळली आहेत त्यामुळे अहमदपूर तालुक्यानजीक आपल्या लोहा तालुक्यातील माळेगांव व परीसरातील काही गावे येतात तेथील सर्व जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे असे डॉ. पुरी यांनी सांगितले व तसेच लोहा तालुक्यातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यासाठी साठा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठांकडे मागणी केली असुन लसीकरणाचा साठा उपलब्ध होताच दिसेल तेथील जनावरांचे लसीकरण करणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.पुरी यांनी दिली व तसेच पशुधन मालकांनी जनावरांना निर्जंतुकीकरण फवारणी करावी असे आवाहन ही डॉ. पुरी यांनी केले आहे.