जा.क्र.-
मा.ना.श्री एकनाथ जी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय,मुंबई.
मार्फत
मा.तहसीलदार साहेब,
तहसील कार्यालय,कळंब.
अर्जदार-अमोल आण्णा शेळके
जिल्हाध्यक्ष-अखिल भारतीय क्रांतिसेना महाराष्ट्र राज्य
विषय- लम्पि स्किन या आजाराचा वाढता प्रकोप लक्षात घेता तातडीने जनावरांचे लसीकरण करणे बाबत,
महोदय,
संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या पशुधनावर लम्पि स्किन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आत्तापर्यंत या रोगामुळे संपूर्ण देशभरात लाखो जनावरांना जीव गमावावा लागला आहे यातच आता उस्मानाबाद व शेजारच्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या पशुधनावर प्रादुर्भाव आढळून आला आहे या पार्श्वभूमीवर आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लवकरात लवकर तातडीने उपाययोजना कराव्या तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील काही ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे लम्पि स्किन हा गोट पॉक्स विषाणू (देवी) लम्पि स्किन रोग गाय व म्हैस वर्गात होत असल्यामुळे जनावरांना ताप येणे,जनावरांच्या तोंडात श्वसन नलिकेत व घशात गाठी येतात व दूध देण्याचे प्रमाण कमी होणे गाभण जनावर गर्भपात होणे ओढ काम करणाऱ्या जनावरांची कार्यक्षमता कमी होने अशी लक्षण दिसून येतात व जनावरे दगावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत या रोगाचा प्रसार इतर तालुक्यात व जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर लंपी स्किन या आजाराचे इन्फेक्शन कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून प्राण्यांमध्ये संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत लवकरात लवकर उपाययोजना कराव्या व योग्य ते नियोजन करून जनावरांचे लसीकरण तातडीने करावे ही नम्र विनंती