मंगळवेढा येथे समृद्धी ट्रॅक्टर्सच्या नुतनीकरण समारंभ संपन्न!* (अभिजीत या नावाप्रमाणेच आपली "जीत" होत रहावी:- ह.भ.प. जयवंत महाराज बोधले)

 *मंगळवेढा येथे समृद्धी ट्रॅक्टर्सच्या नुतनीकरण समारंभ संपन्न!* 



(अभिजीत या नावाप्रमाणेच आपली "जीत" होत रहावी:- ह.भ.प. जयवंत महाराज बोधले)



*कारखान्यातील व राजकारण्यातील "वर्म" अभिजीत आबांना कळले आहे:- हभप, जयवंत महाराज बोधले*


*यंंदाच्या वर्षी १ हजार ट्रॅक्टर विक्री करण्याचे उद्दिष्ट:-* अभिजीत पाटील (चेअरमन: श्री विठ्ठल सह.साखर कारखाना)


प्रतिनिधी/-


मंगळवेढा येथे समृद्धी ट्रॅक्टर्सच्या नुतनीकरण समारंभ दिमाखात संपन्न झाले याप्रसंगी ह.भ.प.जयवंत महाराज बोधले, धनश्री उद्योग समूहाचे अध्यक्ष मा शिवाजीरावकांळुगे सर, जेष्ठ नेते बबनराव आवताडे,(संचालक डि सी सी,बॅक), स्वेरी काॅलेज अध्यक्ष बी.पी.रोंगेसर, उद्योगपती संजय मालक आवताडे, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल दादा सावंत, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन तानाजी खरात, जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, राष्ट्रवादीचे नेते लतीफभाई तांबोळी, उद्योजक कन्हैया हजारे, शेतकरी संघटनेचे रणजीत बागल यासह आदीच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.



यावेळी ह.भ.प. जयवंत महाराज बोधले  म्हणाले की, ट्रॅक्टर दुरुस्त करता.. करता.. ते आज ट्रॅक्टर शोरुमचे मालक झाले आहेत "दुरुस्त" करणे हा गुण घेवून अभिजीत पाटील यांनी आजपर्यंत सहा कारखाने दुरुस्त करून यशस्वीरीत्या चालवले आहेत. कुठे कसे कधी भार द्यायचा हे वर्म अभिजीत पाटील यांना चांगल्या पद्धने कळाला आहे. तुमचे अभि"जीत" आहे या नावाप्रमाणेच आपली "जीत" होत रहावी अशी भावना ह.भ.प. जयवंत महाराज बोधले व्यक्त केली.



यावेळी विठ्ठल कारखान्याचे  चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, सुरवातीचा काळ हा संघर्षाचा असताना 2010 साली ट्रॅक्टरची डिलरशीप घेतली त्याला आज 12 वर्ष पूर्ण झाले आजपर्यंत तब्बल सहा हजार ट्रॅक्टर विक्री झाले आहे. यंंदाच्या वर्षी एक हजार ट्रॅक्टर विक्री करण्याचे उद्दिष्ट असून तो पुर्ण होईल असा विश्वास व्यक्त पाटील यांनी केला.



यावेळी भागातील आजी माजी नगराध्यक्ष व 

श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे संचालक तुकाराम मस्केसर 

धाराशिव साखर कारखान्याचे संचालक अभिजीत कदम, मा. नगराध्यक्ष पांडुरंग ताड, मा.नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, सुनिल पाटील, विठ्ठल सह.साखर कारखान्याचे संचालक, सुरेश भुसे, महेश खटके, विठ्ठल पाटील, नवनाथ नाईकनवरे, कालिदास सांळुखे, प्रवीण कोळेकर,बाळासाहेब हाके, यासह सोनालिका स्टेट ओमप्रकाश दुधाटे, सचिन दराडे, सुबोध कुमार समृद्धी ट्रॅक्टरचे मॅनेजर   सोमनाथ केसकर सर्व टीम व भागातील शेतकरी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad