आज लोहा येथे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांची जाहिर सभा व शाखा उद्घाटन सोहळा

 आज लोहा येथे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांची जाहिर सभा व शाखा उद्घाटन सोहळा



 *लोहा तालुका प्रतिनिधी शुभम उत्तरवार*  

 

       आज दि.(११) सप्टेंबर रोजी लोहा येथे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांची जाहिर सभा व शाखा उद्घाटन सोहळयाचे आयोजन केले असल्याची माहिती नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नवनाथ (बापू)रोहिदास चव्हाण यांनी दिली. 

          लोहा शहरातील जुना लोहा येथील श्री हनुमान मंदिराजवळ आज दि.(११) सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांची जाहिर सभा होणार असुन शहरात युवा सेनेच्या नुतन तीन शाखांचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

           शिवसेना युवासेना लोहा-कंधार आयोजित सभेस मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण, लोहा न.पा.चे नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती गजानन कदम जिल्हाप्रमुख युवा सेना नांदेड, नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण जिल्हा नियोजन समिती सदस्य नांदेड यांची राहणार असून सदरिल सभेचे निमंत्रक महेश पाटील चव्हाण युवा सेना शहराध्यक्ष हे आहेत. 

            आज होणाऱ्या भव्य जाहिर सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शहराचे भुमिपुत्र नवनाथ (बापू)रोहिदास चव्हाण यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.