◼️लोहा तालुक्यात बोगस वृक्षलागवडीने गाठला फजा
अधिकारी बनले दलाल तर , गुत्तेदार झाले मालामाल
*लोहा तालुका प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा : - झाडे लावा झाडे जगवा हि योजना आता कागदावर पहावयास मिळत आहे कोरोना काळात अनेक माणसं ऑक्सिजन विना मरण पावली झाडे हि मानवाला नैसर्गिक ऑक्सिजन देतात व हवा शुद्ध राहते राज्य सुजलाम सुफलाम दिसण्यासाठी शासनाने वृक्ष लागवडीस प्राधान्य दिले पण तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे न लावताच काहीनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात ओले करून बोगस कामे दाखवून पैसे जवळच्या लोकांच्या खात्यात टाकुन त्या व्यक्तीचे एटीएम खिशात ठेवून पैसे उचलुन घेतले लोहा तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीत लाखोंचा भष्टाचार केल्याचं चित्र दिसुन येत आहे.
लोहा तालुक्यात रिसनगाव येथे UNR वन परिक्षेञ नांदेड ५० हजार मिश्र छोटी पिशवी रोपवाटिकेवर बोगस कामगार दाखवुन बोगस जाॅबकार्ड दाखवुन बालकामगारांकडुन काम करून घेत असुन तात्काळ त्या कंञाटदारावर / गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बालाजी शिंदे यांनी केली आहे.
लोहा तालुका हा वृक्षलागवड योजनेमध्ये भष्टाचाराच्या विख्यात अडकलेला दिसुन येत असुन अनेक ठिकाणी घटना स्थळी झाडेच नाही तर काही ठिकाणी निवेदन देताच लावण्यात आली असुन संबंधित वन विभागाचे भ्रष्ट अधिकारी व लाचार गुत्तेदार यांची तातडीने चौकशी करा अन्यथा अमरण उपोषण करण्यात येईल इशारा बालाजी शिंदे यांनी दिला आहे