लोहा तालुका येथे गणेश विसर्जन
मोठ्या जल्लोषात व शांततेत साजरा
----------------------------------------
*लोहा तालुका प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा शहरात श्री चे विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेत करण्यात आले आहे यावेळी लोहा न.पा.ने उत्कृष्ट नियोजन केले.
लोहयात अनेक गणेश मंडळांनी दि. ३१ ऑगस्ट रोजी श्री स्थापना केली व दि. ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी च्या दिवशी श्री चे विसर्जन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे नारे देत लोहा शहरातील देऊळगल्ली, जुना लोहा, इंदिरानगर, शिवकल्याण नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक सह शहरात आदी ठिकाणी गणेश भक्तांनी लोहा शहरात दि. ३१ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थी ला श्री गणेशाची स्थापना केली व दि. ९ सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी ला श्री गणेशाचे मोठ्या भक्तिभावाने वाजत गाजत मिरवणूक मुख्य रस्त्याने काढून सुनेगाव तलावात विसर्जन केले.
यावेळी लोहा न.पा.ने गणपती विसर्जनाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोहता येणाऱ्या भोई समाज बांधवांच्या मदतीने तराफाच्या सहाय्याने लोहा शहरातील श्री गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
यावेळी लोहा न.पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड व न.पा.चे कर्मचारी स्वतः गणेश विसर्जनाच्या वेळी सुनेगाव तलावाच्या काठी टेंट टाकून हजर होते.
तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी कंधार शरद मंडलिक, लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंढे, डीवायएसपी मारोती थोरात, पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी सुनेगाव येथील श्री गणेशाचे विसर्जन करणाऱ्या तलावास भेट देऊन पाहणी केली.
तसेच देऊळगल्ली येथील गणेश मंडळांनी आपल्या भारत देशाच्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा सुंदर देखावा सादर केला .
एकंदरीत लोहा शहरात श्री चे विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
लोहा न.पा.ने उत्कृष्ट नियोजन केले होते