*सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न..
*नात्यातला जीव्हाळा, प्रेम व आपुलकी स्नेहभावाने जतन करत कुटुंब व्यवस्था भक्कम उभी राहणेसाठी तरुणांनी अहंकार सोडून देवून 21 व्या शतकातील आव्हाने पेलन्यासाठी सज्ज होणे काळाची गरज असे प्रतिपादन प्रा.गणेश शिंदे यांनी केले. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, सहकार शिरोमणी वसंतदादांचे स्वप्न पुढे घेवून जात असताना अविरतपणे जनसेवेचे कार्य चेअरमन कल्याणराव काळे गेली 22 वर्षापासून अखंड जोपासत आहेत.*
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प.डॉ.जयवंत बोधले महाराज होते. कार्यक्रमप्रसंगी युवा गर्जना व उपस्थित सर्वांच्यावतीने चेअरमन कल्याणराव काळे यांचा सन्मान ह.भ.प.डॉ.बोधले महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे सर्व संचालक, प्रतिभादेवी पतसंस्था, यशवंतराव चव्हाण पतसंस्था, निशिगंधा सह.बँक यांचे सर्व संचालक, सुप्रभात मित्र मंडळाचे सर्व सदस्य, युवा-गर्जनेचे सर्व युवा शिलेदार, विविध संस्थांचे पदाधिकारी यांचेसह ग्रामीण भागातील युवक मोठया संख्येनी उपस्थित होते.
Nationalist Congress Party - NCP
NCP Solapur
Kalyanrao Kale
Nagesh Phate -नागेश फाटे