नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॕकेत दलालांच्या डोक्यावर शाखा अधिकारी यांचा हात.!* *अनेकांच्या पैश्यात घोळ.ATMकार्ड नावालाच.*

 

*नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॕकेत दलालांच्या डोक्यावर शाखा अधिकारी यांचा हात.!* 


 *अनेकांच्या पैश्यात घोळ.ATMकार्ड नावालाच.* 


 *बँक दलालाच्या तावडीतुन मुक्त करण्यासाठी ATM कार्ड सुरळीत करा.माजी सैनिक संघटनेची मागणी* 

--------------------------------------------------------------- 



* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 



काही वर्षाखाली जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕक डपघाईला आणली होती.परंतु आता कुठे तरी ही बॕक पुर्वपदावर आली आहे.शासनाचे अनुदान या बॕकेत जमा होत असल्याने अनेक शेतकरी, खातेदार या बॕकेत गर्दी करत आहेत.याच गर्दीचा फायदा घेऊन दलालानी चांगलाच खेळ मांडला आहे.आनेक लाभार्थाचे अनुदान गायब होत आहेत.बॕकेत पैसे मिळण्यासाठी जे टोकन दिले जात आहे ते नावालाच आहे.शेतकऱ्यांनकडे टोकन आहे परंतु पैसे गायब होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.दलाल पैसे काडुन देण्याच्या नावाखाली पैसे उखळण्याचे काम मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे.ज्या लोकांचा बॕकेत काहीच संबध नसताना बॕकेत अधिकारी असल्यासारखे दलाल वावरत आहेत.या दलालांच्या डोक्यावर शाखा अधिकारी यांचा हात आसल्याचे दिसुन येत आहे.बॕकेतील व्यहवार सुरळीत करण्यासाठी येथिल दलाला आळा घाला अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.


कंधार येथिल नांदेड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॕकेत जवळपास 30हजाराच्या जवळ खातेदार आहेत त्यापैकी 20ते 25हजार हे शेतकऱ्यांचे अनुदान खाते आहेत.एक ते दिड वर्षापुर्वीच जिल्हा बॕकेची निवड झाली.निवड झाल्याच्या काही दिवसातच उपाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व खातेदारांना ATMकार्ड देणार असल्याची घोषणा केली होती.यातील 4ते 5 हजार खातेदारांनकडेच ATMकार्ड आहेत.बाकी लोकांनकडे कार्ड नसल्यामुळे त्यांना व्यहवार करण्यासाठी बॕकेतच यावे लागत आहे. या बॕकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.या गर्दीचा फायदा या बॕकेतील दलाल हे शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत.अनेक लाभार्थी हे पैसे उचलले नसताना हि पैसे उचललात असे सांगुन लाभार्थ्याचे अनुदान गायब करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.सांयकाळी पाच च्या नंतर पैसे देता येत नसताना ही मर्जितल्या लोकांना पैसे दिल्या जात असल्याचे समोर येत आहे.विशेष बाब म्हणजे या बॕकेत दररोज गोंधळ निर्माण होत आहे.पाताळगंगा येथिल शेतकरी सटवा संभाजी चुक्कलवाड या शेतकऱ्यांच्या नावावर चार हजाराहुन अधिक अनुदान जमा झाले होते.हा शेतकरी बॕकेत पोसे उचलण्यासाठी गेला असता तुम्ही पैसे उचलले आसे ठणकावुन सांगण्यात आले.हा शेतकरी बॕकेच्या खेटा मारत आहे.याच बरोबर बाचोटी येथिल भागवत डुबरे या शेतकऱ्याने पैसे उचलण्याची स्लिप बरुन दिली असता त्याला टोकन देण्यात आले. भागवत डुबरे यांच्याकडे टोकन असताना तुम्ही पैसे घेऊन गेलात म्हध मॕनेजर यांनी सांगुन हात वर केले.असे अनेक गैरप्रकार बॕकेत घडत आहेत.काही दलाल तर आपल्या घरात बसुनच टोकन वाटप करत असल्याचे बोलल्या जात आहे.जर टोकन दलांच्या घरुन वाटप होत असतील तर हे टोकन येतात कुठून व शाखा अधिकारी काय करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.

    

या सर्व गैरप्रकाराला कुठे तरी जाब बसावा यासाठी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,बॕकेतील कारभार हा दलालमुक्त झाला पाहिजे यासाठी शासनाने कडक पाउले उचलावीत.सर्व खातेदारांना ATMकार्ड देवुन बॕकेचा व्यहवार सुरळीत करावा.या बाॕकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला जात असुन अनुदान लाभार्थ्यांची दलाल अर्थिक लुट करत आहेत.या बाबीकडे गाभिर्यांने दखल घ्यावी अन्यथा माजी सैनिक संघटना जिल्हा बॕके समोर उपोषण करेल असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.या निवेदनावर अर्जुन कांबळे तालुका अध्यक्ष,माजी संभाजी कल्याणकर,माजी सैनिक गणपत शिवाजी राठोड,पोचीराम वाघमारे सचिव अदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad