लोहा येथील युवा पत्रकार गोविंद पवार यांना युवाराज्यचा युवा पत्रकार पुरस्कार जाहीर
* नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
लोहा येथील युवा पत्रकार गोविंद क्षण पाटील पवार यांना युवाराज्यचा युवा पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.दैनिक चालूवार्ता चे उपसंपादक लोहा तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी तरूण तडफदार उच्चशिक्षित युवा पत्रकार गोविंद पाटील पवार यांनी अल्पावधीतच पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य विषयक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले शेतकरी , कष्टकरी यांच्या प्रश्नाला वाचा फोडली तालुक्यातील रस्त्यांची झालेली दैना लोकप्रतिनिधी व प्रशासनाची हतबलता हे मुद्दे उचलून धरले निर्भीड व निःपक्ष पाती लिखाण केले त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल युवाराज्य या वर्तमानपत्रांनी घेऊन त्यांना २०२२ चा युवाराज्य युवा पत्रकार पुरस्कार जाहीर केला असुन सदरील पुरस्कार हा नांदेड येथे दि. २५ सप्टेंबर रोजी एका शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
गोविंद पाटील पवार यांना युवाराज्यचा युवा पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे आ मोहन आणा हंबर्डे , नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी माजी उपनगराध्यक्ष शरद पा पवार , नगरसेवक नब्बी शेख , आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे, शेकापच्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे , वंचीत बहुजन आघाडीचे सतीश भाऊ आनेराव महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ लोहा , माजी सरपंच सुदाम पाटील बुद्रुक, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार, जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, पत्रकार बापू गायखर, पत्रकार विलास सावळे, पत्रकार केशवराव पाटील पवार पञकार डि एन कांबळे , पञकार जगदीश पा कदम संपादक फेरोज मणियार , बाळासाहेब कतुरे,पत्रकार शिवराज पाटील पवार, पत्रकार संजय कहाळेकर, पत्रकार शिवराज दाढेल, पत्रकार विजय चन्नावार, छायाचित्रकार विनोद महाबळे, या आझाद ग्रुपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे,आझाद ग्रुपचे लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर, अमोल पा ढगे , श्रीकांत पा पवार सुदर्शन शेबाळे संग्राम डिकळे तालुकाभरासह जिलहाभरातुन यांच्या सह सर्व मित्रपरिवाराने अभिनंदन केले .