नामदार सुधीर मुनगुंटीवार यांचा 14 सप्टेंबर रोजी मुंबईत महासभेच्या वतीने भव्य सत्कार
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने मुंबई येथील वाशी भागात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक 14 सप्टेंबर रोज बुधवारी सायंकाळी चार वाजता करण्यात आले आहे.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांची उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार मदन येरावार, आमदार समीर कुणावार, उद्योगपती रमेश पारसेवार, दिलीप कंदकुर्ते, प्रशांत निलावार, एकनाथराव मामडे, राम शेट्टी, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार, ज्ञानेश्वर महाजन, अनिल मनाठकर, संघटन प्रमुख प्रदिप कोकडवार, प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार यांच्यासह बीड, लातूर, औरंगाबाद, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, नांदेड, वर्धा, नाशिक, पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नामदार सुधीर मुनगंटीवार यांची नुकतीच राज्याच्या मंत्रिमंडळात वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने हा भव्य दिव्य सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसापासून हा सत्कार सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महासभेचे पदाधिकारी मुंबई येथे तळ ठोकून आहेत.