स्वेरी अभियांत्रिकीतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न


स्वेरी अभियांत्रिकीतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न




पंढरपूर-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. 

        सन २०१८-१९ मध्ये स्वेरीत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली, विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली उच्चतंत्र शिक्षणाचे धडे गिरवत असताना स्वेरीतील शिस्त व संस्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे परिपक्वता आल्याचे या समारंभात दिसून येत होते. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपले उत्स्फूर्त मनोगत मांडले. निरोप समारंभाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील आठवणी, रात्र अभ्यासिकेद्वारे अभ्यास करण्याची लागलेली सवय आणि अशा अनेक आठवणी सांगितल्या. स्वेरीमधील चार वर्षातील आपले अनुभव व्यक्त करताना क्षिप्रा कुरणावळ, निकिता भोसले, धनराज भोसले, गिरीश शेट्टीगार, प्रतिक वाळुजकर या विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीनी शिक्षणातून आलेला अनुभव, स्वेरीच्या शिक्षण संस्कृतीचा भविष्यात होणारा फायदा आदी बाबींना उजाळा दिला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबरोबर फोटो ही काढले. चार वर्षातील अनुभव आणि आठवणींच्या हिंदोळ्यावरील काही क्षणचित्रे विद्यार्थ्यांनी एका व्हिडीओमधून सादर केली. या व्हिडिओ मध्ये विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांशी चर्चा करताना, महत्वाचे मार्गदर्शन करताना, प्रॉक्टर सेशन, विशेष शैक्षणिक कार्यक्रम आदी विशेष क्षणांचा व्हिडीओ मध्ये समावेश केला होता. यावेळी इलाईट चे विद्यार्थी समन्वयक ऋतुराज तारापुरकर, सुदर्शन नरसाळे यांच्यासह विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. ए. ए. कदम व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. दिशा भट्टड, स्वराली जोशी व शिवराज मगर यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कॅनी शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad