विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम* (आज विठ्ठल साखर कारखान्याच्या कामगारांचे सर्वरोग निदान शिबीर) १ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपणसह विविध कार्यक्रम

 विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत  पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम



(आज विठ्ठल साखर कारखान्याच्या कामगारांचे  सर्वरोग निदान शिबीर)



१ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपणसह  विविध कार्यक्रम


*पंढरपूर /प्रतिनिधी__


पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराचे नेते आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त रविवार दि ३१जुलै आणि १ऑगस्ट रोजी कारखाना कार्यस्थळासह  विविध भागात  स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये रविवारी सकाळी ११वाजता    श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर विठ्ठल कारखान्याच्या सर्व कामगार यांच्यासाठी सर्वरोग निदान आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती प्र.कार्यकारी संचालक  डी.आर.गायकवाड यांनी दिली.


 यावेळी याशिबिराचे उदघाटन चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह व्हाइस चेअरमन, व संचालक मंडळीच्या शुभहस्ते होणार आहे.


सोमवार दि १ऑगस्ट रोजी सकाळी ९:३०वाजता कारखाना स्थळावर तालुका कृषी अधिकारी महेश देवकते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहें. 

याचवेळी कारखाना कार्यस्थळावर भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहें. या शिबिराचे उदघाटन स्वेरी समूहाचे प्रमुख डॉ बी पी रोंगेसर  यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रम बरोबरच सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता नागनाथ  मुखबधीर विद्यालय बाभुळगाव येथील मुलांना मिष्ठान्न भोजन देण्यात येणार आहें. वरील सर्व स्तुत्य उपक्रम बरोबर तालुक्यातील विविध गावामध्ये कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्र. कार्यकारी संचालक डी.आर. गायकवाड यांच्या वतीने देण्यात आली आहें.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad