बोगस डॉक्टर प्रकरणीका कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 बोगस डॉक्टर प्रकरणीका कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टर वर जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचा कोणताही अंकुश नसून कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा शिक्षण नसताना सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट पंढरपूर मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या सह सोलापूर शहर लगत असलेल्या नवीन व्हिडिओ घरकुल तळे हिप्परगा सांगोला माळशिरस बार्शी तुंगत कामती बोरामणी या भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून हे बोगस डॉक्टर बिनदिकीतपणे आपला वैद्यकीय व्यवसाय थाटून जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या नाकावर टिच्चून सोलापूर जिल्ह्यातील रुग्णावर उपचार करत आहेत अशा बोगस डॉक्टरांना इंजेक्शन अथवा सलाईन लावण्याची परवानगी नसताना हे बोगस डॉक्टर ग्रामीण भागातील रुग्णावर उपचार करून आपला वैद्यकीय व्यवसाय करत आहेत अशा बोगस डॉक्टर मुळे एखाद्याचा प्राण गमावण्याची शक्यता असून चुकीच्या उपचारामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता दाट असल्याने ग्राहक कल्याण फाउंडेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कडक कारवाई करावी म्हणून




*दिनांक 2/6/2022 रोजी जिल्हाधिकारी सोलापूर*

*दिनांक 10/6/2022 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर*

*दिनांक 11/7/2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर*

यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रारी केल्या होत्या परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कोणतीच कारवाई केली नसल्याने

 ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी

*दिनांक 19/7/2022 रोजी अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई*

 यांच्याकडे मेल करून थेट तक्रार दाखल केली होती

 या विषयाच्या अनुषंगाने

 *मा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिनांक 7/6/2022 रोजी पत्र क्र सा शा / संकीर्ण 2 ब आर आर 684 नुसार 

 सोलापूर जिल्ह्यातील बोगस *डॉक्टर वर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना दिले आहेत*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad