एमएचटी-सीईटी २०२२ साठी भरलेल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची संधी
एमएचटी-सीईटी २०२२ साठी भरलेल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची संधी
पंढरपूर - 'एमएचटी- सीईटी २०२२ या सामाईक प्रवेश परीक्षेकरीता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची सुविधा (एडिट फॅसिलीटी) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ सीईटी फॉर्म भरताना काही त्रुटी राहिलेल्या असतील अशा विद्यार्थ्यांनी घ्यावा.' असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमएचटी- सीईटी २०२२ या सामाईक प्रवेश परीक्षेकरीता प्रशासनाच्या नोंदीनुसार ६,०६,१४२ उमेदवारांनी परीक्षा शुल्क अदा करुन नोंदणी प्रक्रिया पुर्ण केलेली आहे. यामध्ये काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या निदर्शनास आल्या असून त्या दुरुस्त करण्याबाबत महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष कार्यालयाकडे दुरध्वनी, ईमेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती करण्यात आलेली होती. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन व एक विशेष बाब म्हणून उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जात खालील नमूद माहिती मध्ये बदल करण्याबाबत प्रशासनाकडून संधी देण्यात येत आहे. यामध्ये अनुक्रमे उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, पीसीएम, पीसीबी ग्रुप बदल, ग्रुप समावेश आदी बदल करण्याचा कालावधी दि. २३/०६/२०२२ ते ३०/०६/२०२२ असून या कालावधीमध्ये उमेदवारांनी स्वतःच्या लॉगीनमधून अर्जामध्ये सुधारणा करावी.
असे आवाहन महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त (भाप्रसे) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी
टोल फ्री क्रमांक- ८९२९१००६१४ व प्रा. उत्तम अनुसे (मोबा.क्र. ९१६८६५५३६५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.