संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या मान्यवरांनी केला स्वेरी अभियांत्रिकीचा अभ्यास दौरा


संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या मान्यवरांनी केला स्वेरी अभियांत्रिकीचा अभ्यास दौरा



पंढरपूर- मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स मधील मान्यवरांनी स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचा नुकताच अभ्यास दौरा केला व विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या स्वेरीच्या शैक्षणिक क्षेत्रातील गरुडझेपेबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. 

      संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स मधील अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. गिरीश एम. मालू, आय.क्यू. ए. सी.च्या समन्वयक डॉ. सौ.सायली एस.जोशी, प्रा. एम.ए.बोटे, प्रा.यु.व्ही.हिरेमठ, प्रा.व्ही.जे.सावंत, प्रा.एन.एस. हुन्नरगी, इन्स्टिट्युटचे रजिस्ट्रार अझरूद्दीन मुल्ला, प्रा. कार्तिक के. निकम, प्रा. महेश एम.कांबळे व प्रा. एस.एम. मधाळे यांनी स्वेरीला भेट दिली. स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’ चे ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले असून ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव महाविद्यालय ठरले आहे. त्या निमित्ताने स्वेरीतील शैक्षणिक उपक्रमांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला स्वेरी अभियांत्रिकीतील आय.क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रा. डॉ.एस.एस. वांगीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे सांगितले. यावेळी प्राध्यापकांनी विविध विभागांना भेटी घेवून संवादही साधला. ‘स्वेरी मधील सर्वोत्कृष्ट सुविधा व कार्यपद्धती जाणून घेण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.’ असे अधिष्ठाता डॉ. गिरीश मालू यांनी सांगितले. स्वेरीची शिक्षण पद्धती व कार्यप्रणाली पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबत बोलताना डॉ. सौ.सायली जोशी म्हणाल्या की 'स्वेरीतील विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली शिस्त व आदर या बाबी अनुकरणीय असून विद्यार्थ्यांना संस्कारित करणे ही फार अवघड गोष्ट आहे आणि ही गोष्ट स्वेरीमध्ये सहज साध्य केली जाते, हे नक्कीच स्तुत्य आहे.’ यावेळी संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या सर्व प्राध्यापकांनी स्वेरी कॅम्पस मधील सर्व विभाग, अद्ययावत प्रयोगशाळा, वर्कशॉप, संशोधन विभाग, या सह विविध विभागांना भेटी देवून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या समवेत स्वेरीचे सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad