सांगोला साखर कारखाना गाळपसाठी होतोय सज्ज!* (धाराशिव साखर कारखाना युनिट४च्या मिल रोलरचे पूजन संपन्न)

 *सांगोला साखर कारखाना गाळपसाठी होतोय सज्ज!*


(धाराशिव साखर कारखाना युनिट४च्या मिल रोलरचे पूजन संपन्न)



पंढरपूर/प्रतिनिधी


वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना युनिट४च्या मिल रोलरचे पूजन शुक्रवारी ह. भ .प. मधुकरआबा नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. त्यामुळे हा कारखाना लवकरच आगामी गाळपसाठी सज्ज राहणार आहे. धाराशिव साखर कारखाना युनिट२ नाशिक येथील कारखान्याचेही नुकतेच मिल रोलर पूजन संपन्न झाले असून उर्वरीत दोन्हीही कारखान्याचे मिल रोलर ही लवकरच होणार आहे.


राज्यामध्ये अनेक बंद पडलेला साखर कारखाना अल्पावधीत सुरू करून कारखान्याकडे असलेल्या देणी बाबत कसलीही अडचण न आणता चोखपणे आर्थिक व्यवहार सांभाळले जाण्याची परंपरा चेअरमन अभिजीत पाटील यांनी यापुढीलही काळात जोपासणार असल्याचे सांगितले आहे.मागील अनेक वर्षांपासून बंद असलेला हा सांगोला साखर कारखाना आपण यशस्वीरीत्या सुरू करू शकलो, सांगोला साखर कारखाना हा १२ वर्ष बंद अवस्थेत असल्याने गतवर्ष हंगामात ३लाख३०हजार यशस्वी गाळप करून, आता दुसऱ्या हंगामात ५ लाख विक्रमी ऊस गाळप केले जाईल असा विश्वास आहे.


ज्या कर्मचाऱ्यांच्या कष्टावर कारखाना सुरू असतो त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत व ह.भ.प.मधुकर आबा नाईकनवरे यांच्या हस्ते मिल रोलर पूजन पार पडले. 


मागील गळीत हंगामात पंढरपुर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ६४००सभासद यांना ऊस घालविण्यासाठी या साखर कारखान्याचे सहकार्य लाभले होते. सध्या पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठलची निवडणूक सुरू आहे., यामध्ये धारशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे सुद्धा मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरले आहेत. यामुळे सहकार्य झालेल्या सभासद मंडळींचे उसाचे पैसे जमा केले आहेत. यानतरच्या काळातही धाराशिव साखर कारखाना कायम सहकार्य करेल. असेही अभिजीत पाटील यांनी सांगितले.


विठ्ठलची निवडणूक होताच लवकरच हा कारखानाही सुरू करण्याच्या दृष्टीनेही जलद हालचाली करून या कारखान्याकडे असलेली सर्व देणी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.   


साखर कारखाने चालविण्यासाठी मोठी हातोटी बसली आहे. त्यामुळे कर्तृत्व पाहूनच विठ्ठलचा सभासद आपणाला या निवडणुकीत नक्की साथ देईल अशी आशा व्यक्त करीत विठ्ठलच्या सभासद आणि कामगारांना चांगले दिवस आणणार असल्याचेही अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.


यावेळी भिमराव आबा भुसे, सुरेश भुसे, युवा नेते सचिन पाटील, तुकाराम आबा कुरे, संचालक भागवत चौगुले, संदिप खारे, रणजीत भोसले, संजय खरात, तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad