विठ्ठल कारखान्याचा एक रुपयाही घरी नेणार नाही* - अभिजीत पाटील
पळशी, सुपली येथे विठ्ठल च्या सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
*(कारखान्याची गाडी, डिझेल व भत्ता घेणार नाही)*
पंढरपूर प्रतिनिधी:-
विठ्ठल कारखान्यापुढे अभिजीत पाटील महत्वाचा नसून कारखाना महत्वाचा आहे.कारखाना चांगला चालला पाहिजे.३ वर्षात दोन वेळा कारखाना बंद पाडून हे दोन्ही दादा १२ वर्षे मिळून सत्तेत होते.त्यावेळी दोघांच्या उदासिन कारभारामुळे हा कारखाना बंद पडला आहे.सभासदांना औदुंबर अण्णांच्या काळाप्रमाणे सोन्याचे दिवस यायचे असतील तर सभासदांनी एकदाच मतरुपी आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी पॅनल चे अभिजीत पाटील यांनी काल *पळशी व सुपली* येथील सभेत बोलताना सभासदांना उद्देशून केली.
सध्या पंढरपूर तालुक्यातील वेणूनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठी चुरस पाहायला मिळत आहे.या निवडणुकीत सत्ताधारी भालके गट,सत्ताधारी गटातून वेगळा झालेला युवराज पाटील गट व प्रमुख विरोधक असलेला अभिजीत पाटील यांचा गट या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.सत्ताधारी दोन्ही गट थकीत देणी व कामगार पगार थकीत राहिल्याने अडचणीत आले आहेत.त्यातच अभिजीत पाटील यांनी चार कारखाने चालवून दाखवत आदर्श निर्माण करून दाखवला आहे.त्यांच्या सभा व गावभेटींना मोठा प्रतिसाद मिळत असून यामुळे सत्ताधारी गटाला त्यांनी घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे.
काल पळशी सुपली येथिल सभेत बोलताना ते म्हणाले की कारखान्याचा खरा मालक सभासद शेतकरी च आहे मात्र काहीजण आपली मालकी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.आपला वारसा सांगून लोकांना फसवत आहेत.मात्र यामुळे सभासद फसणार नाही तो या लोकांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखविल्याशिवाय राहणार नाही.ह्यांनी शेकडो कोटींची कर्जे आपल्या जवळच्या लोकांच्या नावे घेऊन कारखाना बुडवण्याचे पाप केले आहे.आज तेच लोकं ज्यांच्याकडे पैसे आहेत ते सभांना उपस्थित दिसत आहेत.असा घणाघात त्यांनी यावेळी सत्ताधारी दोन्ही गटांवर पळशी व सुपली येथे बोलताना केला.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक हणमंत पाटील, मा.सरपंच नंदकुमार बागल, सदस्य धनंजय बागल, माजी नगराध्यक्ष सुभाष दादा भोसले, धनंजय काळे राजाराम बापू सावंत गायकवाड सर दत्ता नागणे दत्ताभाऊ व्यवहारे दशरथ बाबा जाधव प्रा.मस्के सर, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांसह पंचक्रोशीतील शेतकरी सभासद उपस्थित होते.