बंद कारखाने सुरू करण्याची हातोटी बसलेल्या अभिजीत पाटील यांचा विजय निश्चित* - सुभाषराव माने सर (जि.प.सदस्य)

 *बंद कारखाने सुरू करण्याची हातोटी बसलेल्या अभिजीत पाटील यांचा विजय निश्चित* - सुभाषराव माने सर (जि.प.सदस्य)


(ॲड.वामनराव माने यांचा ईश्वर वठार येथील बैठकीत विजयी गट म्हणून अभिजीत पाटील यांच्यावर ठाम विश्वास)



पंढरपूर / प्रतिनिधी


आपल्या पंढरपूर तालुक्यातील हजारो लोकांचे प्रपंचसाठी मोठा आधार असलेल्या श्री विठ्ठल कारखान्याची अवस्था आज काय करून ठेवली आहे. त्यामुळे ज्यांच्या कार्यकाळात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने जाब विचारण्याची संधी सभासद आणि कामगारांना आली आहे. त्यामुळे त्यांना जाब तर विचारलाच पाहिजे परंतु यापुढील काळात तरी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी ज्यांना बंद पडलेले साखर कारखाने आपल्या पतीवर आणि कौशल्यवर सुरू करण्याची हातोटी आहे. अशा अभिजीत पाटील यांचे उमेदवार नक्की निवडूनही येतील यात शनखा नाही ,त्यामुळे आपणही साथ द्या असे आवाहन अमर पाटील यांनी केले आहे. 


विट्ठल सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित गावभेटी दरम्यान नारायण चिंचोली, ईश्वर वठार येथील बैठकीत अमर पाटील यांनी आवाहन केले आहे. 


अमर पाटील पुढे बोलताना म्हणाले की सांगोला कारखाना अनेक वर्षे बंद पडला होता. तो कारखाना अभिजीत आबा यांनी अवघ्या काही दिवसात सुरू करून, सांगोला बरोबरच पंढरपुर तालुक्यातील विठ्ठलच्या जवळपास६४०० सभासद यांचा उसाचा प्रश्न मार्गी लावत केवळ ऊस नाही तर त्यांचे पैसेही कोणतीही हिकाती न सांगत बसता ते देण्याची भूमिका पार पाडली आहे. याचा ते सभासद नक्की विचार तर करतीलच परंतु इतर सभासदनाही अभिजीत पाटील यांच्या कारभाराची माहिती देतील त्यामुळे या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचे अमर पाटील यांनी सांगितले आहे.


यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनीही आम्ही पाठिंबा देत असताना कोण कारखाना चालू करू शकतो याची खात्री असल्याने अभिजीत पाटील यांना साथ देत आहोत. त्यामुळे तुमच्या उसासाठी आणि बिल मिळविण्यासाठी आम्हाला आंदोलने करण्याची वेळ येणार नाही याचा विचार करून सर्व सभासद यांनी आमच्यावर विस्वास ठेऊन अभिजीत पाटील यांच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले.


तालुक्यातील चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभ्यासू नेते आढीव चे माजी सरपंच दिनकर चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी अभिजीत पाटील यांना साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी प्रदीप कोले, गहिनीनाथ चव्हाण, बापू वसेकर, अभिजीत कवडे, अप्पा वाघमोडे, अरुण वाघ, बापू घाडगे ,बापू कोले, जनार्धन खनदारे, धनाजी पासले, सुनील माने, भाऊ कोले भीमराव कोले, हरिदास वसेकर, बाळू कवडे, नागनाथ माने, नवनाथ नलवडे, बिभीषण माने, भीमराव माने, मकरंद कोले, शिवाजी कोले, आदी उपस्थित होते .

*तुंगत गटातील नेत्यांची अभिजीत पाटील यांना ताकद देणार:-*


 तुंगत गट किंवा परिसरातील अनेक गावातून अभिजीत पाटील यांच्या गटाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले, १२वर्ष बंद पडलेला सांगोला कारखाना अल्पावधीतच सुरू करून किमयाच केली आहे. म्हणून कारखाना चालव

सर्वपरिचित असणारे पंचायत समितीचे माजी सभापती, मार्गदर्शक ॲड.वामनराव माने आणि जि .प सदस्य सुभाषराव माने यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह अभिजीत पाटील यांना साथ देण्याचा भरीव शब्द दिला आहे. यामुळे या भागात अभिजीत पाटील गटाची ताकद वाढली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad