सोलापूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक पारितोषक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
सोलापूर: केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक पारितोषक वितरण सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर ' सकाळ' चे संपादक मा.श्री.अभय दिवाणजी व अभिजीत शिंदे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, तसेच प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.शेखर जगदे व डॉ.रवींद्र व्यवहारे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिक प्रकल्प स्पर्धा 'प्रयोग २k२२' , स्पेशल अवॉर्ड, स्टुडंट्स कौन्सिल अवॉर्ड, अलुमनी अवॉर्ड आणि बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्स अवॉर्ड अशा पाच कॅटेगेरिजमध्ये जवळपास 110 बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थांच्या स्पेशल अचीवेमेंट्ससाठी स्पेशल अवॉर्ड देण्यात आले. तसेच १००% उपस्थितीसाठी प्रथम वर्षाची कु.श्रद्धा कविटकर व संकेत चव्हाण तर अंतिम वर्षाचा शशिकांत पाथरूट यांना गौरवण्यात आले. तसेच बेस्ट अकॅडमीक परफॉर्मन्स कु. उज्ज्वला चव्हाण, इलेक्ट्रिकलची आरती कुंथापले, इएनटीसीची श्रुती बिराजदार, सी.एस.ई. ची निकिता शेट्टी, मेकॅनिकल मधुन स्वराज घोंगडे, तसेच संपूर्ण कॉलेज मधुन सिव्हिलची कु.सायली उबाळे यांना यावर्षीचे 'बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्स' म्हणून गौवरण्यात आले. तसेच रू २००० कॅश प्रायझ सह 'अर्जुन अवॉर्ड' हा सुखदा मोरे हिला तर 'विक्रम अवॉर्ड' कॅश प्राइझ ५००० सह राहुल अडकी, आदित्य म्हणता, विनायक कामुर्ती, सागर बंडगर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा राऊत, सुझान नदाफ, तांजिला बिजली, अपूर्वा एडके, सानिया हकीम, प्राजक्ता सुरवसे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. शेखर जगदे, डॉ. सुवर्णा क्षीरसागर, प्रा. सुनीता सगट स्टुडंट्स कौन्सिलचा जनरल सेक्रेटरी श्रेयस सलगर, स्पोर्ट्स सेक्रेटरी गुरुलिंग जोकर, मीडिया सेक्रेटरी सिद्धार्थ सरवदे व स्टुडंट्स कौन्सिल मेंबर्स यांचा सहभाग होता. यावेळी प्राचार्य डॉ. शंकर नवले व प्रमुख पाहुणे अभय दिवाणजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. शेखर जगदे यांनी केले.