स्वेरी इंजिनिअरिंगचे प्रा.सुभाष जाधव यांना पीएच.डी. प्राप्त
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील आयसी इंजिन प्रयोगशाळेचे प्रमुख प्रा. सुभाष व्यंकटराव जाधव यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून अभियांत्रिकीमधील ‘सर्फस अँड जॉमेट्रीकल मॉडीफिकेशन्स फॉर एनहान्सिंग हीट ट्रान्सफर इन मायक्रो डीवायसेस’ या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला शोधप्रबंध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये सादर केला होता. त्यांच्या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे आज महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने व स्वेरीच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली प्रा.जाधव यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना आई, वडील, भावंडे, पत्नी सौ. चंदाराणी जाधव यांच्यासह स्वेरीच्या इतर प्राध्यापकांचेही बहुमोल सहकार्य लाभल्याचे डॉ. जाधव यांनी आवर्जून सांगितले. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते डॉ.जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोगे, डॉ. प्रशांत पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डे, वर्कशॉप इन्चार्ज प्रा. बी.डी. गायकवाड, प्राध्यापकवर्ग व प्रसाद रोंगे आदी उपस्थित होते. ‘डॉ. जाधव हे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या ११ वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून अनेक शोध प्रबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी राज्यस्तरीय ‘अविष्कार’ या प्रोजेक्ट कॉम्पिटीशनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. पीएच.डी. प्राप्त केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, इतर पदाधिकारी व विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्र.प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. जाधव यांचे अभिनंदन केले.