भिम टायगर सेनेचा माढा तालुका अन्न पुरवठा विभागाला खरमरीत इशारा.
कुर्डुवाडी प्रतिनिधी-अमोल हावले
माढा तालुका भिम टायगर सेनेने आपल्या निवेदनात माढा तालुका अन्न व नागरी पुरवठा विभागाला इशारा दिला आहे कि माढा तालुका व शहरातील मागासवर्गीय व गोरगरीब नागरीकांना गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी.रेशनकार्ड दिलेले आहेत मात्र आजतागायत या नागरिकांना धान्य दिल जात नाही.त्यामुळे गोरगरीब नागरीकांचे हाल होत आहेत.तेंव्हा प्रशासनास विनंती करतो की ताबडतोब आपण याप्रकरणाची चौकशी करुन धान्यापासून वंचित नागरीकांना धन्य वाटप चालू करावे अन्यथा भिम टायगर सेना.माढा तालुक्यात मोठे आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.असे भिम टायगर सेनेचे माढा तालुका अध्यक्ष आकाश विद्यागज यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष सैरभ आखाडे. विजय वाघमारे. उमेश मदने. किरन आवघडे. शुभम महामुनी बाबासाहेब देवकुळे. विठ्ठल वाघचवरे आणी सव॔ भिम टायगर चे पद अधिकारी .सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.