*विठ्ठल मंदिर समितीचा कोट्यावधी रूपये वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील वारकऱ्यांना निस्वार्थ सेवेची संधी द्यावी - विश्व वारकरी सेना*
*(शिर्डी साईबाबा,गजानन महाराज संस्थान शेगाव येथे सेवेसाठी सेवाधारी आहेत त्याचप्रमाणे विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची सेवा करण्यासाठी संधी द्यावी:ह.भ.प.गणेश महाराज शेटे)*
महाक्षेत्र पंढरपूर येथे आज दिनांक 25 एप्रिल रोजी विठ्ठल रुक्मिणी समिती अध्यक्ष ह-भ-प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व मंदिर समितीच्या सर्व विश्वस्त मंडळींना विश्व वारकरी सेनेच्या वतीने विनम्रपणे निवेदन देण्यात आले.
त्यावेळी निवेदनामध्ये पंढरपूर मंदिरांमध्ये वर्षातील वारीच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर समितीस कोट्यवधी रूपयांचा निधी येतो व मंदिर परिसरामध्ये जे कंत्राटी कामगारावर वर्षाकाठी लाखो रुपये खर्च करून मजुर लावले आहेत तो होणारा खर्च वाचविण्यासाठी त्या ऐवजी महाराष्ट्रातील तमाम विठ्ठल भक्ताला सेवाभावी असंख्य वारकरी संघटनेच्या माध्यमातून महाक्षेत्र पंढरपूर मध्ये येणाऱ्या भाविकभक्तांची सेवा करण्याची संधी द्यावी त्याचप्रमाणे मंदिर परिसर व महाद्वार ते चंद्रभागा माते पर्यंत पुंडलिकाच्या मंदिरापर्यंत हा परिसर स्वच्छ राहावा वारक-यांना सर्व सोयीसुविधा मिळावी याकरिता कुठलेही प्रकारचे मानधन न घेता सेवाभावी वृत्तीने अनेक भाविकभक्तांना सेवा देण्याची इच्छा आहे तरी महाराष्ट्रातून सर्व सेवाभावी सेवकांना पंढरीत येणाऱ्या वारक-यांची सेवा करण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने आव्हान करावे संधी प्राप्त करून द्यावी अशी आज आम्ही मागणी केली आहे.
पंढरपूर क्षेत्रांमध्ये पाहिलं चंद्रभागेच्या वाळवंटात घानीचे खूप मोठे साम्राज्य वाढले आहे आणि तेच चंद्रभागेचे पाणी आम्ही वारकरी मोठ्या श्रद्धेने तीर्थ म्हणून प्राशन करताओत आणि यामुळे रोगराई वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे
मिळालेल्या माहितीनुसार मंदिर समितीच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे टेंडर काढून मजुरांवर तो खर्च केला जात आहे हा पैसा परिस्थितीने गरीब असलेल्या भाविकांचा असून त्यांच्या कष्टाचा आहे म्हणून आमची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला नम्र विनंती आहे की ज्याप्रमाणे शिर्डी साईबाबा, गजानन महाराज संस्थान शेगाव येथे सेवाधारी भाविकांच्या माध्यमातून मंदिराचा दर्शन बारी परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले जाते त्याचप्रमाणे आपण जर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थे करिता सेवाधारी मंडळी चे नियोजन केले तर संस्थांचे वार्षिक लाखो रुपये वाचतील त्या पैशामध्ये येणाऱ्या भाविकांची आहे त्यापेक्षा आणखी व्यवस्था करता येईल
स्वतः विठ्ठल रुक्मिणी समितीच्यामाध्यमातून सर्व सेवेकरी अगदी सहज रित्या सेवा करतील व संस्थांच्या कडून कुठल्याही प्रकारचे मानधन न घेता ही व्यवस्था करून दाखवू शकतो तरी आम्हा सर्व सेवेकरींना एकदा वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त करून द्यावी ही नम्र विनंती करण्यात आली
यावेळी विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी, सेवेकरी उपस्थित होते